नांदेड| शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारी संबंधाने अवैध रित्या अग्नीशस्त्रे विक्री करणे, अग्नीशस्त्राचा वापर करणे सोबत बाळगणे, जबरी चोरी, दरोडा, घरफोडी, चोरीवाढत्या प्रमाणा बाबत मा. श्री श्रीकृष्णकोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, मा. सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड यांनी जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन यांना मासीक गुन्हे बैठकीच्यावेळी सुचना देऊन वरील गुन्हयाना आळा घालुन आरोपीताचा शोध घेवुन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणुन मुद्देमाल जप्त करणेबाबत आदेशीत केले.
दिनांक २८/११/२०२३ रोजी पो.स्टे. नांदेड ग्रामीण चे प्रभारी अधिकारी श्रीधर जगताप सपोनि यांना गोपनिय माहीती मिळाली की, काही इसम हे अग्नीशस्त्र व हत्यारे विक्री करण्याचे उद्देशाने विष्णुपुरी परिसरात थांबुन आहेत. अशा माहितीवरुन त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यांना सदर ठिकाणी पाठविले.
मिळालेल्या माहिती प्रमाणे विष्णुपुरी येथे काळेश्वर कमानजवळ छापा मारुन पाच इसमाना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारली असता त्यांची नावे १) आनंद ऊर्फ चिन्नु सरदार यादव वय २३ वर्ष व्यवसाय बेकार रा. वजीराबाद चौरस्ता नांदेड, २) रोहित विजय कुमार कदम वय २० वर्ष व्यवसाय बेकार रा. दत्त मंदीराचे मागे विष्णुपुरी नांदेड, ३) रवि ऊर्फ रविलाला नारायणसिंह ठाकुर वय ३३ वर्ष व्यवसाय बेकार रा. दर्गाजवळ गाडीपुरा नांदेड, ४) कृष्णा पिराजी गायकवाड वय २४ वर्ष व्यवसाय चालक रा. धनगरवाडी ५) प्रविण एकनाथ हंबर्डे वय २० वर्ष व्यावसाय मजुरी रा. हनुमान मंदीर जवळ काळेश्वर रोड विष्णुपुरी, नांदेड असे असल्याचे सांगीतले.
ताब्यात घेतलेल्या इसमांची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचेकडे ०२ अग्नीशस्त्र गावठी पिस्टल, 03 जिवंत काडतुस, ०३ खंजर, एक तलवार, व एक लोखंडी कत्ती, ०२ मोटार सायकलअसा एकुण २,३५,९००/-रूपयाचा मुद्देमाल जप्त केले. त्यांचेवर पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे गुरनं. ८५०/२०२३ कलम ३/२५,४/२५,७/२५ शस्त्र अधिनियम सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास पोउपनि श्री महेश कोरे व पोहेकों सुनिल गटलेवार यांचेकडे देण्यात आलेला असुन सदर गुन्ह्याचे तपासात नमुद आरोपीतांकडे जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी च्या गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला.
यावेळी त्यांनी त्यांचे आणखीन इतर साथीदार १) रोशन गोपाळ पदमवार रा. विष्णुपुरी नांदेड, २) हरिष देविदास शर्मा रा. वजिराबाद नांदेड ३) परमेश्वर बबन कंधारे रा. विष्णुपुरी नांदेड ४) विशाल उर्फ पप्पु नारायण हंबर्डे रा. विष्णुपुरी नांदेड ५) रूपेश बालाजी ठाकुर रा. विष्णुपुरी नांदेड ६) शेख जावेद उर्फ लड्या रा. विष्णुपुरी नांदेड यांचेसह मिळुन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील ०४ आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असुन असे एकुण ०९ आरोपीतांकडून ०३ तोळे सोन्याचे दागिने, ०३ मोबाईल, ०२ पिस्टल व ०३ जिवंत काडतुस, ०३ खंजर, ०१ तलवार, ०१ लोखंडी कत्ती, ०२ मोटार सायकल असा एकुण ३,२५,०००/-(तीन लाख पंचवीस हजार) रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपीतांकडून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदर कारवाई बाबत मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, मा. सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड ग्रामीणचे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनी श्रीधर जगताप व गुन्हे शोध पथक प्रमुख श्री आनंद बिचेवार, पोलीस उपनिरीक्षक, पोहेकॉ प्रभाकर मलदोडे, पोहेकों विक्रम वाकडे, पोहेकॉ संतोष जाधव, पोहेकों ज्ञानोबा कवठेकर, पोना शेख सत्तार, पोना अर्जुन मुंडे, पोकों चंद्रकांत स्वामी, पोकों संतोष बेलुरोड, पोकों ज्ञानेश्वर कलंदर, पोकॉ श्रीराम दासरे, पोकों माधव माने, पोकों शिवानंद तेजबंद, पोकों शिवानंद कानगुले, यांचे विशेष कौतूक केले आहे.