” रघुपती राघव राजाराम…पतीत पावन सिताराम ” घ्या गजरात श्री रामोत्सव सोहळा साजरा

उस्माननगर| अयोध्यामध्ये श्री रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने उस्माननगर सह परिसर रांगोळी,पताक , फटाक्यांची आतषबाजी, श्रीरामा च्या गितानी ,राम ,लक्ष्मण, सिता ,हाणुमान , वेशभूषा करून वाहनातून भव्य दिव्य टाळ मृदंगाच्या निनादत महिला,पुरुष, तरूणी, तरूणांनी पावली खेळत ” रघुपती राघव राजाराम…पतीत पावन सिताराम” च्या गजरात उस्माननगर परिसरात श्रीरामोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला.
मागील आठ पंधरा दिवसांपासून संपूर्ण गावा गावात रामभक्त मंदिरात जाऊन साफ सफाई करून स्वच्छता दररोज सकाळी करण्यात मग्न होते. दि.२२ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता उस्माननगर येथील दत्तमंदिर येथून टाळ,मृदंग, राम , लक्ष्मण, सिता ची छबी निर्माण करून ट्रॅक्टर मधून मिरवणूक निघाली होती.या शोभायात्रेमध्ये महिला पुरुष यांनी टाळ मृदुंग च्या गजरात पावली खेळत खेळत मिरवणूकीत रौनक आली होती . जागोजागी श्रीराम यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.प्रत्येक ठिकाणी खिचडी ,शिरा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.दत्त मंदिरांतून निघालेली मिरवणूक प्रमुख रस्त्यांवरील रांगोळी , पताकांनी नाहून निघाले होते.या मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधवांनी हातात आरतीचे ताट व डोक्यावर कलश घेऊन भव्य दिव्य मिरवणूक काढून राम मंदीरात दुपारी आरती करून नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.महाप्रसादाचा अनेकांनी आस्वाद घेतला. अयोध्यामध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने उस्माननगर परिसरात भगव्या मय वातावरण निर्माण झाले आहे.
तृतीयपंथीकडून श्रीराम शालीचे वाटप – उस्माननगर येथे अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे औचित्य साधून येथील तृतीयपंथीकडून श्रीराम नावांची शाली (दस्ती )चे वाटप संगिता देवकर यांच्या पुढाकाराने भक्तांना वाटप करण्यात आले.यावेळी शिवशंकर काळे ( भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष) , बालाजी घोरबांड , यांच्यासह अनेक भक्त मंडळी उपस्थित होते.
अयोध्यामध्ये होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने उस्माननगर येथील सरपंच सौ शोभाबाई शेषेराव काळम यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील प्रमुख नाल्यांतील घाण,कचर स्वच्छता करू आनंदमय सुखमय वातावरण निर्माण झाले होते.
तरुणांमध्ये उत्साह दिसून आला होता.
