नांदेड| उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. बालाजीराव कल्याणकर व मागासवर्गीय विभागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मतदारसंघातील विविध नगरातील कार्यकर्त्यानी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी अनेक कार्यकर्त्याना मागासवर्गीय विभागाचे पद वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कार्य पद्धतीवर प्रभावित होऊन तरोडा खु, सांगवी,कल्याणनगर,खोब्रागडे नगर व विविध भागातील तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी अमोल पंडित, भास्कर गच्चे,संतोष भद्रे,आकाश कदम,भिमराव दूधमल,अँड. सुनील नागोरे,विक्की गायकवाड, गौतम सोनकांबळे, नरेंद्र भाटापूरकर,नवनाथ कोंडामंगल,विजय बगाटे,अमित थुले, सचिन पिंपळे,शेख उबेद, प्रवीण वाघमारे, आनंद सूर्यवंशी,यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पदे देण्यात आली. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर, शिवसेना संपर्कप्रमुख चंद्रपूर गंगाधर बडूरे, तालूकाप्रमुख भारसावडे,मागासवर्गीय विभाग बिलोली तालूका प्रमुख महेंद्र गायकवाड माजी शहरप्रमुख शक्तिसिंह ठाकूर,गजानन गिरी,राजू मोरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.