
नांदेड। नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या विकास कामांचा धूमधडाका सुरुच असून सुमारे साडे तीन कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. त्यांच्या या विकास कामांचे मतदारसंघातील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले आहे.
नांदेड-वाघाळा मनपा हद्दीतील प्रभाग क्रं. 19 कौठा ,येथील बालाजी मंदिर परिसरातील जोशी यांचे घरापासून कळसकर यांचे घरापर्यंत, परकादे यांचे घरापासून स्वामी यांचे घरापर्यंत,भाले यांचे घरापासून बडवने यांचे घरापर्यंत, राजू बियाणी यांच्या घरापासून जुजाराव यांचे घरापर्यंत,लोहाना यांचे घरापासून नरेश लालवानी यांचे घरापर्यंत, तेलंगे यांचे घरापासून माळशेटवार यांच्या घरापर्यंत, शेरुसिंग यांचे घरापासून सोरोले यांचे घरापर्यंत,डॉ. एकलारे यांचे घरापासून दिनेश प्रेमचंदानी यांचे घरापर्यंत, सुधीरसिंग यांचे घरापासून शेट्टे यांचे घरापर्यंत, शिंदे यांच्या घरापासून हट्टे यांचे घरापर्यंत, बुलबुले यांचे घरापासून कन्नावार यांचे घरापर्यंत, आदी सुमारे 3.50 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आ. मोहनराव हंबर्डे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी मा.नगरसेवक राजू काळे, रविंद्र पेडलवार, शंकर स्वामी, नरेश लालवानी, गंगाबिशन कांकर, उत्तम नरपडे, बुलबुले, गंगाधर बडवणे, कनिष्ठ अभियंता दुबे, गुत्तेदार रोहन मोरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
