नांदेड। आगामी सण व उत्सव अनुषंगाने नांदेड शहरातील गुन्हेगारावर आळा बसविण्यासाठी, कॉम्बीग ऑपरेशन व नाकाबंदी करण्याच्या सुचना श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी आबीनेश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, गौहर हुसेन, सहा. पोलीस अधिक्षक ग्रामीण विभाग शहरातील उप-विभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर, सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा यांना व शहरातील पोस्टे प्रभारी अधिकारी यांना देण्यात आल्या होत्या.
त्या अनुषंगाने दिनांक 10.11.2023 रोजी चे रात्री 11.00 वाजल्या पासुन ते दिनांक 11.11.2023 से 04. 100 वाजे दरम्यान शहरातील सहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 16 ठिकाणी नाकांबदी पॉईंट लावण्यात आले होते. सदर नाकाबंदी मध्ये शहरातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी पोस्टे प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकातील अंमलदार मिळुन एकुण 73 मालाविरूध्दचे गुन्हेगार (दरोडा, जबरी चोरी, घरफोडी) चेक केले.
कोटपा अंतर्गत रेड-01 कलम 110/117 मपोका प्रमाणे 19 कैसेस, मोटार वाहन कायदान्वये कार्यवाही 12 केसेस 10.400/-रु दंड, भारतीय हत्यार कायद्यान्वये 02 कैसेस केल्या असुन, त्यामध्ये चार तलवार व दोन खंजर जप्त करण्यात आले आहेत. उशिरा पर्यंत हॉटेल चालविणे कार्यवाही-1 अशा प्रकारे कारवाया करण्यात आल्या आहेत. सदर कोबींग ऑपरेशन करीता पोलीस अधिकारी- 28, पोलीस अंमलदार-101 मनुष्यबळ वापरण्यात आले होते.
सदरची कार्यवाही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री आबिनेश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री गौहर हुसेन, सहा. पोलीस अधिक्षक ग्रामीण विभाग, मा. श्री सुरज गुरव उपविभागीय पोलीस अधिकारी उप विभाग नांदेड शहर, मा. श्री. सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा, मा. श्री जगदीश भंडरवार, पोनि स्थागुशा, शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार, क्युआरटी, आरसीपीचे अंमलदार यांनी पार पाडली.