राजकिय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गोरेगावच्या आग दुर्घटनेतील जखमींची विचारपूस

मुंबई। गोरेगाव उन्नत नगर येथील जय भवानी एसआरए इमारतीतील आगीत जखमी झालेल्या नागरिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर येथे भेट घेऊन विचारपूस केली. तसेच या दुर्घटनेची चौकशी केली जाईल. त्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे ही मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

नवी दिल्लीतून दौरा आटोपून मुंबईत पोहोचताच मुख्यमंत्री श्री. शिंदे विमानतळावरून थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर येथे पोहोचले. तेथून त्यांनी गोरेगाव येथील घटनास्थळीही भेट देऊन पाहणी केली. स्थानिकांशी संवाद साधत, त्यांना दिलासा दिला. ‘एसआरएच्या अशा इमारतींचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून अशा घटना घडू नयेत याची काळजी घेता येईल. यासाठी एक विशेष अधिकारी नियुक्त केला जाईल. इमारतींचे सर्वेक्षण केले जाईल. अधिकारी इमारतींचे स्ट्रक्चरल आणि, इलेक्ट्रिक ऑडिट करतील, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

यावेळी खासदार गजानन किर्तीकर, मुंबई महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल तसेच वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.तत्पूर्वी, सकाळीच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नवी दिल्ली येथून या घटनेची माहिती घेऊन, दुर्घटनेतील मृत व त्यांच्या कुटुंबियांच्याप्रति सहवेदना प्रकट केली होती. तसेच मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात यावा, असेही निर्देश दिले होते.

गोरेगाव आग दुर्घटनेतील जखमींची मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून विचारपूस
गोरेगाव पश्चिम उन्नतनगर येथील जय भवानी इमारतीला आज (दि. ६ ऑक्टोबर) आग लागली होती. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या आगीच्या घटनेमध्ये जखमी झालेल्या रूग्णांची हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय रुग्णालय व डॉ. रु.नं. कूपर रुग्णालयामध्ये भेट घेऊन विचारपूस केली. रूग्णालयातील जखमींच्या भेटीनंतर प्रत्यक्ष घटनास्थळाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबालसिंह चहल उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.केसरकर म्हणाले की, या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य शासनाद्वारे पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जखमी नागरिकांना उपचारासाठी हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रूग्णालय, कूपर रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या घटनेवर लक्ष असून, दुर्घटनाग्रस्तांवर वेळेत उपचार व मदतीसाठी शासन तत्पर असल्याचेही त्यांनी सांगितले.

इमारतींमध्ये अशा प्रकारच्या आगीच्या दुर्घटना घडू नयेत, यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्याची माहिती मंत्री श्री.केसरकर यांनी दिली. ‘घटनेतील जखमींच्या उपचारासाठीची सर्व मदत करण्यात येत असून, आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत’, असा धीर त्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिला. या दुर्घटनेबाबत चौकशी करण्यात येणार असून घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्वांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल जाईल, असेही त्यांनी सांगितले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!