नांदेड/हिमायतनगर| महाराष्ट्रात चालू असणारी शिक्षकभरती वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. महाराष्ट्रातील खेडोपाड्यांमधील प्राथमिक शाळेमध्ये ६५,१११ शिक्षकांची कमतरता असताना शासन मात्र खाजगीकरण, समूह शाळा आणि आता केंद्र शाळा यांची मॉडेल आणि प्रयोग बनवण्यात व्यस्त आहे.
महाराष्ट्र सरकारने मोठा गाजावाजा करत शिक्षकपदभरती साठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे माहे फेब्रुवारी २०२३ मध्ये आयोजन केले होते, ह्यात महाराष्ट्रातील २,१६,४४३ डी एड बी एड पात्रता धारकांनी परीक्षा दिली असून, १० महिन्याचा कालावधी लोटला तरी गुणवत्ता सिद्ध केलेल्या भावी शिक्षकांना अद्यापपर्यंत नियुक्ती दिली नसल्यामुळे खेड्यापाड्यातील प्राथमिक माध्यमिक शाळेमध्ये मराठी माध्यमांच्या अनेक शिक्षकांचा तुटवडा निर्माण झालेला असतानाही चालू शिक्षक भरती मध्ये मात्र प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा विचार न करता १००% मराठी शाळेमध्ये गुणानुक्रमे (मेरिटनुसार) पात्रता धारण केलेल्या उमेदवारांना बाजूला सरण्यात आले आहे.
आणि इंग्लिश माध्यमाच्या उमेदवारांना मेरीट मध्ये नसताना प्राधान्य देवून भरती प्रकिया राबविण्याचा घात शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग व शासन करत आहे. अनेक तज्ज्ञांनी प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून देणे गरजेचे आहे हे सांगितले असताना मराठी शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या उच्च गुणवत्ता असणाऱ्या शिक्षकांना टाळून इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची भरती शासन करत आहे. मा. उच्च न्यायालयाने सुद्धा इंग्रजी माध्यमाला प्राधान्य न देता मराठी माध्यमातील उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत निर्णय दिलेला असताना प्रशासनातील अधिकारी या आदेशाची पायमल्ली करतांना दिसत आहेत. स्वतः शासनाने सन 2018 मध्ये शासन निर्णय पारित करून सांगितले आहे की, १ली ते ५ वी इयत्तेसाठी इंग्रजी माध्यमातील शिक्षन घेतलेल्या उमेदवारांची आवश्यकता नाही. तरीही शिक्षण मंत्री व प्रशासनातील अधिकारी स्वतःच्याच निर्णयाची पायमल्ली करून एकाधिकार शाही वापरून एकतर्फी निर्णय घेत आहेत.
अशा निर्णयामुळे मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या लाखो डीएड बीएड धारकांवर बेरोजगारीचे संकट ओढावलेले आहे. एकदा पात्रता परीक्षा मध्ये स्वतःची पात्रता सिद्ध केल्यानंतर गुनानुक्रमे मेरिट नुसार निवड केली जाते मात्र शिक्षण विभाग यास फाटा देऊन मेरिट नुसार निवड न करता स्वतःची मनमानी करून माध्यमांचा कमी मेरिटच्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचा घाट घालत आहे यामुळे उच्च गुणवत्ता अन्याय होत आहे. मातृभाषेवर आणि मराठी शाळांवर होणार हा प्रचंड अन्याय, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठठी १४ जानेवारी रोजी नांदेड_यवतमाळ_हिंगोली जिल्ह्यातील असंख्य भावी शिक्षकांनी आपल्या व्यथा लोकप्रतिनिधींकडे मांडल्या.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर रिक्त असलेल्या पदांची भरती करताना विशिष्ठ माध्यमाला झुकते माप देऊन मराठी माध्यमांला डावललं जात आहे. देशभरातील अनेक शिक्षण तज्ञांच्या मते तसेच देशांमध्ये आजवर राबवल्या गेलेल्या शैक्षणिक धोरणांमध्ये, आणि सध्याच्या चालू नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिलं आहे. जागतिक पातळीवरचे अनेक अहवाल देखील मातृभाषेतून शिक्षण दिले गेल् तरच मुलांच्या अभिव्यक्तीला वाव मिळतो त्याच्या सर्वांगीण विकासास ते सहाय्य ठरतं असे सांगत आहेत आणि संशोधनांअंती ते सिद्ध देखील झाल आहे. हे सर्व एका बाजूला असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्र सरकार काही चुकीच्या धारणांवर मातृभाषेतील शिक्षणाला संपुष्टात आणण्याचा प्रघात रचते आहे की काय अशी शंका येते.
त्यामुळेच मराठी शाळांना आणि मातृभाषेला वाचवण्यासाठी नांदेड, यवतमाळ, हिंगोली जिल्ह्यातील अनेक भावी शिक्षकांनी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, मराठवाडा शिक्षक आ.विक्रम काळे, आ.माधवराव पाटील जवळगावकर, विधानपरिषद आ.राम पाटील रातोळीकर, आ.तुषार राठोड, आ. राजेश पवार, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर,यांच्या भेटी घेऊन या ज्वलंत प्रश्नांला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सतिश गोपतवाड, तुषार देशमुख, परमानंद खराटे, प्रणिता देशमुख, संतोष केंद्रे, शेख मतीन, मिरा आठवले, दिपक हणमंते, ए एस कापसे, प्रतीक्षा जोशी, सुनील अन्नपुरवे, सोनाली पाटील, वर्षा व्यवहारे, भावना बलपेलवाड, सारिका इंगोले, प्रवीण पौळ, प्रमोद जुने, राजेश जाधव, अमोल राठोड, सतिश जाधव, साईनाथ गाढे, शंकर ठाकूर, विलास इंगळे, माधव वाडीकर, राजू कदम, गोविंद तोटेवाड, साईचरण पेंडकर, प्रमोद वाघमारे, तानाजी तेलंगे, सुर्यकांत गाडीवाडे, निखिल घेटे, तिरुपती पाटील, गोविंद चोपडे, अब्दुल मोईन, गजानन भोकरे, अनिता सवंडकर, मुकेश घोंगडे, जी आर दळवी, यांच्यासह शेकडो अभियोग्यताधारक युवक युवती उपस्थित होते
महाराष्ट्र सरकारने मोठा गाजावाजा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित संस्था मधील शिक्षक रिक्तपदे भरण्यासाठी डी.एड.बी.एड. धारकांची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी मागील वर्षी घेतली असून ह्यात २,१६,४४३ पात्रता धारकांनी परिक्षा दिली असून ह्यात गुणवत्ता सिद्ध केलेल्या अभियोग्यता धारकांना डावलून विशिष्ठ माध्यमाला प्राधान्य देवुन एक प्रकारे गुणवत्ता सिद्ध केलेल्या अभियोग्यता धारकांना डावलण्याचे काम हे सरकार करत असून गुणवत्तेला प्राधान्य देवुन मेरीट नुसारच शिक्षक भरती व्हावी ह्यासाठी माझ्या स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी महाराष्ट्रातील अभियोग्यता धारकांच्या नांदेड येथील भेटीत म्हटले आहे…..