नायगाव, रामप्रसाद चन्नावार। शिक्षणाचे महत्त्व आपणास समजले नसल्याने शैक्षणिक राजकीय सर्व बाबतीतील प्रगती खुंटली असून आज मुलाचे शिक्षण धोक्यात येत आहे तर अंधश्रद्धेला नाकारून पोथी पुराणाच्या बाहेर बारा बलुतेदार समाजाने पडणे गरजेचे आहे, काळानुसार वज्रमुठ बांधून आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत आपले ओबीसी उमेदवार पाठवा तेव्हाच समाज पटलावर येईल असे प्रखड मत प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक आनंद कर्णे यांनी आयोजित मेळाव्यात व्यक्त केले.

नायगाव शहरात महर्षी विश्वकर्मा जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त बारा बलुतेदार समाज प्रबोधन मेळावा आयोजित प्रसंगी अध्यक्षस्थानी सूर्याजी पाटील चाडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे ,देविदास पाटील बोमनाळे ,प्रा. लक्ष्मण कोंडावार, अँड.बाळासाहेब पांचाळ, नागनाथराव लोहगावकर, धनराज शिरोळे, केशव दादजवार, नामदेव पांचाळ, सुरेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महर्षी विश्वकर्मा मूर्तीस व छत्रपती शिवाजी महाराज, संत रविदास, संत गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

बारा बलुतेदार मेळाव्यानिमित्त प्राध्यापक लक्ष्मण कोंडावार, बाळासाहेब पांचाळ, यासह अनेकांनी आपले प्रबोधनात्मक विचार मांडले. माणिकराव लोहगावे बोलताना म्हणाले की, बलुतेदारी ही पद्धत आज इतिहास जमा झालेली आहे. संविधानाप्रमाणे कोणीही कुठलेही व्यवसाय करीत आहेत पण आपण उपेक्षितांचे जीवन जगत असताना समाजाची काही देणे लागते म्हणून समाज काळानुसार चालावे.

यावेळी आयोजक श्रीधर पांचाळ बाबलगावकर, सुभाष पोतदार, वैजनाथ भोकरे, मारुती पांचाळ, संतोष पांचाळ, ओंमकार पांचाळ, रामेश्वर पांचाळ, संगम पांचाळ, राजेश पांचाळ, काशीनाथ भोकरे, के टी पांचाळ, बी आर पांचाळ, किशन पांचाळ, श्याम सुवर्णकार, डॉक्टर राहुल पांचाळ, डॉक्टर राम पांचाळ, नरसिंग पांचाळ यासह महिला पुरुष यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पांचाळ यांनी तर आभार गंगाधर माऊले यांनी मानले.
सूर्याजी पाटील चाडकर
आरक्षणाच्या लढ्यासाठी एकजूट महत्वाची असणे यासाठी हा बारा बलुतेदार मेळावा महत्त्वाचा ठरावा यासाठी आगामी निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना आपण मतदान करावे आणि आपली ताकद दाखवली जावी.
