अयोध्या निमंत्रण अक्षदा पूजन कार्यक्रम संपन्न
नवीन नांदेड। हडको येथील बालाजी मंदिर देवस्थान येथे अयोध्या श्रीराम मंदिर येथुन पूजनीय अक्षदा व राममंदिर असलेल्या माहिती पत्रकाचे वाटप व महाआरती ३१ डिसेंबर रोजी करण्यात आले, यावेळी बालाजी मंदिर देवस्थान विश्वस्त यांच्या सह मोठया संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
अयोध्या येथील श्रीराम मंदिर मध्ये 22 जानेवारी रोजी रामल्ला च्या मूर्ती ची प्राणप्रतीष्ठा होनार आहे 500 वर्षा नंतर प्रभूश्री राम तंबू मधून मंदिर मध्ये विराजमान होतं आहे,हा दिवस हिंदुनी मोठ्या उत्साहात दिवाळी सारखा साजरा करावे तसेच 22 जानेवारी रोजी अयोध्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न होणार आहे, त्या दिवशी प्रत्येकाच आयोध्या ला जाणे शक्य होणार नाही त्यामुळे अयोध्या मधून पूजनीय अक्षदा आणि राममंदिर ची माहिती असेलेले पत्रक नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक हिंदु च्या घरोघरी जाऊ स्वयंसेवक वाटणार आहे प्रत्येक हिंदु बांधव 22 जानेवारीला आपल्या घरी त्याची पूजन करावे या करिता लोकउत्सव समिती तर्फे हडको येथील बालाजी मंदिर मध्ये अक्षदाचे पूजा अर्चना पुजारी इंद्रजित दुबे यांनी मंत्रोच्चार विधीवत पुजन केले.
यावेळी अक्षदा वितरण अभियान प्रमुख शुभम गोपीनवार, सह प्रमुख श्रीनिवास आमीलकंठवार, लोकउत्सव समिती चे गजाननसिहं चंदेल, सचिन वानोळे, तुकाराम बेस्ते,गजानन गोरे,दिपक देशपांडे,प्रकाश जिंदम,संतोष अवधूतवार,शंतनू कचवे,अभिषेक कटकुले,प्रभाकर पुजारी,मनमथ सांभळे,वामसी पचनुरे, गणेश ठाकूर,तुळशीराम घोघरे, साईनाथ येरावार,साई गोणे,अजिंक्य जहाँगीरदार, ओंकार नाईक यांचासह बालाजी मंदिर विश्वस्त अरुण दमकोडंवार, बालासाहेब मोरे,बाबुराव येरेगेवार, त्र्यंबक सरोदे,व भाविक भक्तांची मोठया संख्येने उपस्थित होते.