नायगाव, रामप्रसाद चन्नावार। आपल्या कला क्षेत्रात यशाचे शिखर गाठून विविध पुरस्काराने सन्मानित झालेले पंडित बाबुराव उप्पलवार, कुमारी शिवानी स्वामी, संजय उमाटे, ज्ञानेश्वर बैस व हावगी पन्नासे या कलारत्न पुरस्कार प्राप्त असलेल्या महान व्यक्तीचा नायगाव येथे अविष्कार संगीत संचच्या वतीने प्रसिद्ध शाहीर दिगु तुमवाड यांच्या अध्यक्षतेखाली व बाबुराव लंगडापुरे, प्रकाश पाटील भिलवंडे, ताराबाई बोंमनाळे, ज्युनिअर जॉनी लिव्हर रामेश्वर भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मान करण्यात आला आहे.
संगीत क्षेत्रामध्ये पंडित बाबुराव उप्पलवार गुरुजी यांचे फार मोठे नाव आहे त्यांनी संगीत क्षेत्रात अनेक माणसे घडवली असून त्यांचा या संगीत क्षेत्राशी फार मोठा अनुभव आहे, कमी शब्दात सांगणे उचित वाटणार नाही, त्यांच्या संगीत क्षेत्रातला अनुभव साहित्य रूपात असावा त्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावे असे आवर्जून प्रसिद्ध शाहीर दिगु तुमवाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
नायगाव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अविष्कार संगीत संच आयोजित सन्मान कर्तत्वाचा सोहळा या कार्यक्रमात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईच्या वतीने संगीत रत्न पुरस्कार बहाल झालेले पंडित बाबुराव उप्पलवार,इंडियन आयडॉल 14 फेम मध्ये सहभागी झालेली कुमारी शिवानी शिवदास स्वामी, ताल मार्तंड पुरस्कार प्राप्तचे संजय उमाटे, मराठवाडा क्रीडा रत्न पुरस्काराचे मानकरी ज्ञानेश्वर बैस,स्वर शिरोमणी पुरस्कार प्राप्त असलेले हावगी पन्नासे यांना आपल्या अविष्कार संगीत संचच्या वतीने सन्मानित करण्यासाठी प्राध्यापक शंकर बिरादार, प्राध्यापक माधव किनाळकर, नामदेव पांचाळ, बालाजी चौधरी, विश्वेश्वर जोशी, शंकर पाटील मुगावकर, त्र्यंबक स्वामी, बालाजी पेटेकर, माधव भेदेकर, विजयकुमार द्रोणाचार्य, संजय शेट्टकर, बाळू भेदेकर यांनी आयोजन करून कलाक्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या कलारत्नाचा अविष्कार संगीत संचच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला असून यावेळी नामदेव फुलारी, गणेश हाके, पोलीस कर्मचारी तुपदाळे, विकास भुरे,मनोज आरगुलवाड, देशपांडे, पवन गादेवार, वसंत माने,दिगंबर झुंजारे यासह संगीत प्रेमी महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती, या कार्यक्रमात प्रारंभी प्रस्तावना प्राध्यापक माधव किनाळकर यांनी केले तर सुंदर सूत्रसंचालन त्र्यंबक स्वामी आणि आभार नामदेव पांचाळ यांनी मानले आहे.
सदर सन्मान कर्तुत्वाचा सोहळा हा कार्यक्रम संपल्यानंतर एकादशी निमित्त इंडियन आयडॉल 14 फेमच्या गायिका कुमारी शिवानी शिवदास स्वामी यांचा बहारदार संगीत रजनी कार्यक्रम पार पडला असून कुमारी शिवानी स्वामी हिने राग रागिनी सह अधीर गुलाल उधळीत रंग, कलंदर मस्त कलंदर या गीताचे गायन केल्याने प्रेक्षक वर्ग मंत्रमुग्ध झाले.