Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- Sonapir Dargah : मुतवल्ली बाबर भाई यांच्या निवेदनावरून सहाय्यक संचालकांनी केली सोनापीर दर्गाहची पाहणी
- Gharkul : घरकुलाचे हप्ते आणि मोफत वाळूसाठी माहूरमध्ये आमरण उपोषण सुरू
- Chicken gunnya : हिमायतनगर तालुकयातील जिरोना – गणेशवाडी गावाला डेंग्यूसह चिकन गुणियाच्या साथीने घेरले
- Om Namah Shivay : वाढोणाच्या श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मासाची सुरुवात “ओम नमः शिवाय” नाम जाप यज्ञाने होणार
- Tree Plantation : वृक्षारोपण प्रेरणा मास उपक्रम शिक्षक सेना नांदेड शाखेच्या वतीने उत्साहात साजरा
- Sand thift Mahur : वाळू चोरी करून फरार झालेले चार ट्रॅक्टर जप्त; तहसीलदार मुगाजी काकडे यांनी केला होता गुन्हा दाखल
- Micro Finance : “आरबीआयचे नियम धाब्यावर – मायक्रो फायनान्सची बेलगाम वसुली”
- Gopu Mahamune : भाजपा माहुर शहराध्यक्ष पदी गोपु महामुने यांची निवड
Author: NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
चंद्रपूर। संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्र शासनाने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे. अनेक आंदोलनातून हे मंत्रालय स्थापन करता आले, याचा अभिमान आहे. केवळ पाच महिन्यात दिव्यांग बांधवांच्या दारी हे मंत्रालय आले असून दिव्यांगांच्या चेह-यावर आनंद झळकविण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (मंत्री दर्जा) यांनी दिली. शकुंतला लॉन येथे दिव्यांग कल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित ‘दिव्यांगांच्या दारी अभियानात’ मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम,…
मुंबई। अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार(२८ ता)होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती.राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता. अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश…
नांदेड। मराठा समाजाला सरसगट कुणबी दाखले देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मुख्य मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करीत होते . सरकारच्या मन धरणीनंतर सतराव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण सोडून त्या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये साखळी उपोषण करण्यात यावे असे आवाहन केले होते . गाव पातळीवर सुद्धा या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत सर्वसामान्य मराठ्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड येथे दिनांक 29 सप्टेंबर ते 13 ऑक्टोंबर साखळी उपोषणास बसण्याचा निर्धार समस्त मराठा महिला भगिनीनी केला आहे. सदरील हे साखळी…
नवीन नांदेड। नांदेड तालुक्यातील बळीरामपुर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हिम्मंतपुर येथील नागरिकांना पुरवठा करण्यात येणांऱ्या राशन ( धान्य ) दुकानदारा कडुन लाभार्थांना धान्य वाटप लाभार्थांच्या संख्या पेक्षा कमी धान्य देणे,आंनदाचा शिद्याचे वाटप न करणे अशा तक्रारी केल्यानंतर वाजेगाव जिल्हा परिषद सदस्य तथा नांदेड तालुका क्रॉगेस आयचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील शिंदे यांनी भेट देत दुकान चालकांकडुन ” मापात पाप ” होत असल्याचे निर्दशनास आल्यानंतर या दुकानदारंका विरुध्द कार्यवाही करण्याचे आश्वासन दिपक मराळे नायब तहसिलदार यांनी दिले . नांदेड तालुक्यातील बळीरामपुर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हिम्मतपुर येथील राशन दुकान क्रमांक १७१ मधील ८२ लाभार्थी असुन उर्वरीत ३६५ लाभार्धी हे बळीरामपुर येथील आहेत ,या ८२…
नवीन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय सिडको ६ अंतर्गत तिन ठिकाणी घाटावर संकलन तर क्षेत्रीय कार्यालय येथे श्री मुर्ती संकलन करण्यात येणार आहेत, असुन नानकसर झरी येथे शहरातील व परिसरातील मुर्ती विसर्जन करण्यात येणार असून या ठिकाणी आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांच्या सह मनपा प्रशासनाने भेट देऊन पाहणी केली. २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी निमित्ताने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत चार ठिकाणी मुर्ती संकलन करण्यात येणार असून या ठिकाणी भक्तांन कडे असलेल्या मुर्ती विधीवत पुजा केल्यानंतर संकलन करण्यात येणार आहे , यात नाव घाट वसरणी,साईबाबा मंदीर कौठा,जुना कौठा घाट तर सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे श्री…
हिमायतनगर। तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून सोयाबीन पिकावर यलो मौजेक नावाचा रोग आला असून, कवळ्या शेंगा परिपक्व होण्याच्या अगोदरच सोयाबीनचे झाडे कोमजुन जात आहेत तर पाने पिवळी पडून सोयाबीन ची उत्पादकता घटण्याची शक्यता वाढली आहे. अगोदरच शेतकरी राजा हैराण असतांना आता हातातोंडाशी आलेल्या पिकांवर सततच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अर्थिक संकटात सापडला आहे. हिमायतनगर तालुक्यात खरीप हंगामात पेरणी झाल्यानंतर अतिवृष्टी झाली, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून व खरडून गेल्यानं शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यातून कसेबसे बाहेर येताच पिकांची वाढ खुंटली, आणि आता हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकावर येलो मोजेक नावाच्या व्हायरसचा हल्ला झाला आहे. यामुळं पिके पिवळी होऊन सोयाबीनच्या…
हिमायतनगर। मराठा आरक्षण मिळत नसल्याने नैराश्ये पोटी आत्महत्या केलेल्या कामारी येथिल सुदर्शन देवराये यांच्या कुटूंबाला खासदार हेमंत पाटिल यांनी रोख एक लाख रूपयाची मदत केली असुन यापुढे पत्नीला गोदावरी अर्बन बँकेत नौकरी लावु असा शब्द दिला असल्याची माहिती सकल मराठा समाजा कडुन दिगांबर शिरफुले यांनी माध्यमांना दिली. दि. २६ मंगळवारी कामारी येथिल साखळी उपोषणाला खासदार हेमंत पाटील यांनी भेट देवुन उपोषणार्थींशी संवाद साधला, सुदर्शन देवराये यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून गरज पडल्यास संपर्क साधा केंव्हाही सहकार्य करतो असे सांगत, यथायोग्य एक लाख रुपयाची मदत सुदर्शन देवराये यांचे वडील ज्ञानेश्वर देवराये यांच्याकडे दिली. खासदार भाऊंची भावना होती, या हाताकडुन त्या हाताला दिलेल्या…
मुंबई/नांदेड/हिमायतनगर। मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी साखळी उपोषणाला बसलेल्या कामारी येथील सुदर्शन देवराये या युवकांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदरील मयताच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता मधून मदत देण्याची मागणी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भेट घेऊन केली आहे. हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील सुदर्शन देवराये या तरुण युवक मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला बसुन होता. आपल्या समाजाला आरक्षण मिळत नाही या विवंचनेत राहून सुदर्शन देवराये या युवकांने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यामुळे मराठा समाज बांधवाने हिमायतनगर शहर कडकडीत बंद करून सरकारचा निषेध केला आहे. त्याबरोबरच संतापलेल्या सकल मराठा समाजाने…
मुंबई। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची सकल नोंदणी २०३५ पर्यंत ५० टक्के इतकी आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज राज्यातील उच्च शिक्षणातील सकल नोंदणी ३२ इतकी आहे. मात्र गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात हे प्रमाण अवघे १४ टक्के आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील ड्रॉप आउट दर फार जास्त आहे. हे चित्र बदलून आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील टक्का वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरु करावी तसेच त्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबत विचार करावा, अशी सूचना राज्यपालांनी राज्यातील कुलगुरूंना केली. ‘अदिवासी विकास व संशोधन’ या विषयावर राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या दुसऱ्या परिषदेचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २६) राजभवन मुंबई येथे संपन्न झाले,…
नांदेड। शिक्षकांच्या जिल्हा व राज्य पातळीवरील पदोन्नत्यांसह सर्व व्यावसायिक प्रश्न सोडवूच सोबतच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास शिक्षक व कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागु करु असे स्पष्ट आश्वासन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादीत जिल्हा परिषद नांदेडच्या ९४ व्या वार्षिक सभेचे उद्घाटन करताना दिले. कार्यक्रमाच्या प्रथम सत्राच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वसंतराव चव्हाण हे होते. पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, शिक्षक हा समाजाला दिशा देणारा वर्ग आहे. समाज व देशोन्नतीसाठी आपले योगदान मोठे आहे. नांदेड जिल्ह्यात मागच्या ९४ वर्षापासुन ही सहकारी पतसंस्था स्वतःची प्रगती व सभासदांना आर्थिक संकटाच्या काळात सहकार्य करीत आहे.…