धर्म-अध्यात्मनांदेड

वाघाळा येथील दत्त मंदिर संस्थान येथे अखंड दत्तनाम चातुर्मास समाप्ती सोह ळा व महापूजा आयोजन

नविन नांदेडl दत्त मठ संस्थांन वाघाळा येथे अखंड दत्तनाम चातुर्मास सोहळा दि.१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून विविध धार्मिक कार्यक्रमासह पालखी मिरवणुक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड दत्तनाम चातुर्मास समाप्ती सोहळा गुरु आनंदगिर महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने आयोजित करण्यात आला असून प्रमुख गुरुवर्य श्री गुरु रुद्रगिरी महाराज किवळेकर, श्री गुरु समगिरी गुरु जयगिरी महाराज, श्री गुरु दत्तगिरी गुरु आनंदगिरी महाराज यांची उपस्थिती राहणार असून सकाळी ६ वाजता आरती व १० वाजता पालखी मिरवणुक, दुपारी ११:३० ते १२:३० श्री गुरु रुद्रगिर, गुरु दयाळगिर महाराज किवळेकर महाराज यांचे प्रवचन, आणि रात्री ८ वाजता सव्वा मन तांदळाची आनंद दत्त महापुजा आहे. महापुजेवरील आयोजक म्हणून द.भ.प.भोंग गुरुजी हे राहणार असून महापुजेला वाघाळा, सिडको, हडको, गोपाळ चावडी, पावरलूम, ढाकणी, असदवन, बाभूळगांव, झरी, बोरगांव, नांदगाव, किवळा, टाकळगाव, वडगाव, कौडगाव, वाका या सह इतर ग्रामीण भागातील भजनी मंडळाची उपस्थिती राहणार आहे.

चातुर्मासातील नैमित्तिक भजनी विठ्ठल पा. घोगरे, लालाराव पा.घोगरे, बाबुराव घोगरे, संजय पा. घोगरे, गंगाधर वडजे, आबाजी पा. घोगरे, किसन पा. घोगरे, हनुमंतराव पो.पा.घोगरे, दादाराव पा. घोगरे, मधुकर पा.घोगरे, महेश पा. घोगरे, शिवाजी पा.घोगरे, गंगाधर पा. घोगरे, दिपक पा. खैरे, आनेश पा. घोगरे, लक्षमण हाटकर, श्रीराम इंगेवाड, शंकर काळेवाड, संतोष खैरे माधव पद्मने, हनमंत पेदेवाड, दिपक खैरे, मारोती पा.घोगरे, यादवराव पा. घोगरे हे होते तर पुजारी म्हणून शिवाजी दिगांबर पुरी महाराज हे आहेत. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी वाघाळा यांनी केलेले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!