नांदेड/हिमायतनगर। सर्व सामान्य नागरिकांना केंद्र बिंदू मानून आपण काम करीत असून, अजित दादा पवार यांनी जी भुमिका घेतली, त्या भुमिकेचे स्वागत राज्यातील जनतेने केले आहे. आपण सर्वानीच या भूमिकेला प्रतिसाद दयावा. अजित दादा हे फुले ,शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारे नेते आहेत. अजित दादांच्या घेतलेल्या भूमिकेला आपण सर्वानी प्रतिसाद द्यावा. असे अवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गटाचे नूतन जिल्हाध्यक्ष इंजिनिअर विश्वांबर पवार यांनी केले.
तसेच अभिषेक लूटे व एकनाथ जाधव पाटील यांना जी पक्षाकडून लागणारी आवश्यक ती मदत देणार आहे. सर्व जेष्ठ, श्रेष्ठ मंडळींना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी आपण सातत्यानं प्रयत्न करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष इंजिनिअर विश्वांबर पवार यांनी सांगीतले. या प्रसंगी भागोराव देशमुखे, अशोक मेंडके, दत्ता वाकोडे, अशोक बोईनवाड,आनंदराव घुंगरे,दिगांबर निमलवाड,श्रीराम बेले, संजय बेले आदींसह असंख्य कार्यकर्त्यानी जिल्हाध्यक्ष इंजिनिअर विश्वांबर पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
यावेळी नांदेड मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे, जेष्ठ पत्रकार अहेमदभाई करखेलीकर, विलास गजभारे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर देशमुख, रवि गेंटेवाड, पंकज देशमुख, आनंद पाटील सिंधीकर, प्रतिक कदम, प्रविण घुले, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्याची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती.