नांदेड/किनवट| वाळू व मुरमाचे अवैध्य उत्खनन करून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दंडात्मक कारवाईची मोहिम नुकतीच हाती घेतली आहे. शासनाचा महसूल बुडवून इस्लापूर पांगरी येथील शिवारात मुरमाचे अवैध उत्खनन करून अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांना मिळताच त्यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेशित केले होते.
त्यानुसार नायब तहसीलदार विकास राठोड यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या टिमसह जायमोक्यावर जावून हायवा क्रमांक MH 24 Au 6776 व टिप्पर क्रमांक MH 27 bx 0153 आणि पोकलॅड मशीन ताब्यात घेऊन कारवाई करत एक टिपर एक हायवा व पोकलॅड मशीन इस्लापूर पोलीस ठाण्यात आणून पोलीसांच्या ताब्यात दिली आहे. या कार्यवाहीमुळे अवैद्यरित्या गौण खंजीची चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेएन एस यांच्या या कारवाईमुळे अवैद्य उत्खनन करून अवैधरित्या मुरमाची वाहतूक करणाऱ्यांनी या कारवाईमुळे चांगलाच धसका घेतला आहे. ही कारवाई महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेएन एस यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून, या कारवाई दरम्यान नायब तहसीलदार विकास राठोड मंडळ अधिकारी प्रेमानंद लाटकर तलाठी बालाजी वसमतकर, अंकुर सकवान, विश्वास फड, मंगेश बोधे, व चालक गौसखान हे उपस्थित होते. महसूल प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे इस्लापूर परिसरात चांगलेच चर्चेला उधाण आले.