फटाके फोडतानी व विक्री करतानी अश्या लोकांवर कार्यवाही करावी अन्यथा अवमान याचिका दाखल करण्यात येणार – ॲड. अनुप आगाशे
नांदेड| फटाके फोडतानी व विक्री करतानी अश्या लोकांवर कार्यवाही करावी यांची दक्षता घ्यावी की शासकीय नियमांचे उल्लंघन व न्यायालयाच्या आदेशाचे अवमान करून नये अन्यथा मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. पोलिस महासंचालक मुंबई,मा विभागीय आयुक्त औरंगाबाद, मा.जिल्हाधिकारी नांदेड, मा. पोलिस अधीक्षक नांदेड, मा.मनपा आयुक्त नांदेड न्यालयाच्या आदेशाचे पालन केले नाही म्हणून आपल्या विरूद्ध न्यालयाचे अहवान याचिका दाखल करण्यात येणार असे दिनांक २६/१०/२३ रोजी आम आदमी पार्टीचे ली आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनुप आगाशे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मा. पोलिस महसंचालक, मा. विभागीय आयुक्त यांना जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत निवेदन देऊन तसेच जिल्हाधिकारी नांदेड, पोलिस अधीक्षक नांदेड, मनपा आयुक्त नांदेड यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
ॲड. अनुप आगाशे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, फटाक्यांसाठी ठरवून दिलेली लांबी व व्यासाची मर्यादा उत्पादकांनी तोडली आहे. तर बंदी असलेल्या देवी-देवतांचे फोटो छापलेलीही फटाके विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. त्यामुळे शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याची बाब समोर येत आहे. फटाका दहा सेंटीमीटरहून अधिक लांब आणि अडीच से.मी.पेक्षा अधिक व्यासाचा नसावा, फटाक्यांच्या लांबीवर २० फुटांची मर्यादा, पिवळा आणि पांढरा फॉस्फरस असलेल्या तडतड्याही घातक, वेडेवाकडे आणि अनिश्चित दिशेने जाणारे रॉकेटवर बंदी, तर इमारतीपासून ५०० मीटर अंतरावर फटाके फोडायचे नाहीत आणि रात्री १० ते पहाटे पाच वाजेपर्यंत तर फोडण्यास बंदी… ही आहे दिवाळीत फटाके फोडण्यासाठीची राज्य सरकारची नियमावली.
परंतु त्याचे पालन करायचे ठरविल्यास ६० ते ७० टक्के फटाके फुटणारच नाहीत अशी परिस्थिती सध्या बाजारात आहे.त्यामुळेच हे नियम सर्रास धाब्यावर बसवून फटाक्यांचा धुमधडाका करण्याची ‘परंपरा’ सालाबादप्रमाणे यंदाही जळगावमध्ये सुरूच राहणार आहे. विशेष म्हणजे हे नियम सुध्दा नागरिकांपर्यंत पोहचवण्यात शासकीय यंत्रना कमी पडली असून याबाबत कोणतेही प्रबोधन समाजात प्रभावीपणे केले जात नाही.बाजारात मिळत असलेल्या पुटपुट्या, नोटोमिक्स, चिरपुडी या नावाने विकल्या जाणाऱ्या तडतड्यांमध्ये क्लोरेट तसेच विषारी पिवळा आणि पांढरा फॉस्फरस यांचे मिश्रण असते. हे विषारी मिश्रण जर चुकून लहान मुलाने खाल्ले तर त्याचा जीव देखील जाऊ शकतो.
वाकडेतिकडे उडणारे रॉकेट मालमत्तेससह लोकांच्या जिवासही धोका निर्माण करू शकतात. त्यामुळेच उखळीबार, हवाई, डे-आऊट, नाइट-आऊट, रॉकेट यासारख्या फटाक्यांवर बंदी आहे.अॅटमबॉम्ब मध्ये जवळपास ७५ टक्के स्फोटक पदार्थ कागदात गुंडाळून साध्या दोरीने बांधलेला असतो. त्याचा आकार ३.८१ सेमी लांब आणि १.९० सेमी व्यासाचा असतो. त्यामुळे त्याला धोकादायक श्रेणीत गणले जाते. त्यामुळे त्यावर देखील बंदी आहे.देवी-देवतांचे फोटो किंवा धार्मिक ग्रंथांचा मजकूर असलेले कागद फटाक्यांसाठी वापरू नयेत, असेही शासनाचे स्पष्ट निर्देश असतांना देखील बेधडकपणे लक्ष्मी बॉम्ब सारखे फटाके विकले जात आहेत. अशी अनेक कायद्याने बंदी असलेले फटाके जळगावच्या बाजारात सर्रास विकले जात आहेत.विशेष म्हणजे लाखो-करोडोंची रुपयांची उलाढाल होणाऱ्या या व्यवसायात अधिकृत फटाके विक्रीचा परवाना धारकांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे.
रस्तोरस्ती उभारलेले अनेक स्टॉल व दुकाने बेकायदा पद्धतीने फटाक्यांची विक्री करत असल्याचे चित्र प्रत्येक चौकात व गल्लीत दिसत आहे. मनपा किवा जिल्हा प्रशासन यावर कुठलीही कारवाई करीत नसून दुर्लक्ष करीत आहे. बंदी असलेल्या परिसरातही ‘धूम धडाका’कोणत्याही इमारतीपासून ५० मीटर अंतराच्या आत आणि शाळा, कॉलेज, कोर्ट, हॉस्पिटल आदी शांतता क्षेत्रापासून १०० मीटर अंतरात फटाके फोडू नये अशी कायद्याने बंदी घातलेली आहे. असे असतांना देखील नियम धाब्यावर बसवीत या परिसरात सर्रास फटाके फोडणे सुरू असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. कायद्याने बंदी असलेले फटाके विकणारे आणि फोडण्याऱ्यांना आठ दिवसांचा कारावास किंवा १ हजार २५० रुपये दंडाची तरतूद आहे. परंतु, आजवर अशी शिक्षा कुणालाही झाल्याचे दिसत नाही. असे आम आदमी पार्टीचे ली आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनुप आगाशे यांनी म्हटले आहे