तोल जाऊन विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

कंधार,सचिन मोरे। तालुक्यातील चिंचोली (प.क.) येथील श्रीहरी देवराव कौसल्य २२ रोजी सकाळी ६ वाजता शिवारातील शेतातून विहिरीचे पाणी आणताना पाय घसरून किंवा तोल जाऊन पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
तालुक्यातील चिंचोली (प.क) येथील शेतकरी २२ रोजी सकाळी ६ वाजता श्रीहरी देवराव कोसल्य वय (६५ वर्षे) गावातील किशन नागोबा कौसल्य यांच्या विहिरीवरून लक्ष्मी पूजनासाठी घागर घेऊन पाणी आणण्यासाठी गेले असता पाणी भरत असताना त्यांचा पाय घसरून किंवा तोल जाऊन विहिरीत पाण्यात पडून मृत्यु झाला.
त्यांना पोहता येत नव्हते ते बराच वेळ घरी परत न आल्याने त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह पाण्यावर विरहित तरंगत असताना व घागर ही पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. याबाबत शिवहार केरबा कौसल्य यांनी कंधार पोलीस स्टेशनला दिलेल्या अर्जावरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. यु. गणाचार्य हे करीत आहे.
