नवीन नांदेड। असदवन येथील कलुबाई भ्र.तुकाराम कस्तुरे या सकाळी जनावरांसाठी चारा आणण्यास निघाल्या असता त्यांना विषारी सापाने दंश केल्याने त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊ आनंदराव संभाजी तेलंगे हे मिस्त्री काम करीत असून त्यानी दिलेल्या फिर्यादीत त्यांची बहीण कल्याबाई भ्र तुकाराम कस्तुरे ही घर काम करीत असून तिला एक मुलगा आहे व तो नोकरी निमित्त रत्नागिरी येथे राहतो माझी बहिण ही माझ्या शेजारी राहते.

दि 4 डिसेंम्बर रोजी सकाळी जनावरांसाठी सकाळी 7 च्या सुमारास चारा आणण्यासाठी गेली असता परत येतांना माळाजवळ गायरानात विषारी साप डाव्या पायाच्या पंजाला चावल्यामुळे तिला उपचारासाठी सरकारी दवाखाना येथे नेले असता उपचारादरम्यान मरण पावल्याचे वेधकीय अधिकारी यांनी सांगितले असून नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखालीअधिक तपास पोलीस अंमलदार शेख इब्राहिम हे करीत आहेत.

