नांदेड। अप्पर पोलीस महासंचालक (तुरुंग) यांच्या पथकाने नांदेडच्या कारागृहात अचानकपणे तपासणी केल्यानंतर त्याठिकाणी आक्षेपार्ह वस्तू सापडल्याने दोन जेलर आणि चार पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. या कार्यवाहीची खळबळ उडाली आहे.
राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (तुरुंग) अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार एक विशेष पथक नांदेडच्या कारागृहाच्या पाहणीसाठी पाठविण्यात आले. एक महिन्यापूर्वी देखील असेच पथक पाठविण्यात आले होते. तुरुंगातील वेगवेगळ्या बॅरेगची तपासणी केल्यानंतर काही आक्षेपार्ह आणि अनियमित वस्तू त्यात आढळून आल्याने पथकाने पंचनामा केला.
कारागृहात बंदीस असलेल्या कैद्यांकडे ब्लेड, गुटखा, तंबाखू आदी वस्तू सापडल्या. याबद्दल स्थानिक कारागृहातील अधिकारी व शिपायांना याबाबत विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. काल सायंकाळपर्यंत ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर व पंचनामा केल्यानंतर पथकाने मुख्य कारागृह अधिकारी यांच्याकडे आदेश सोपविले. त्यानुसार जेलर गट-१ चे रविंद्र रावे, जेलर गट-२ चे अधिकारी शिंगाडे, पोलीस शिपाई राहुल केशहाळे, जगदीश काकड, श्यामसुंदर भोले आणि चन्ने अशा सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे.
तुरुंगातील वैâद्यांच्या बाबतीत काही गोपनिय माहिती या पथकाला मिळाल्यानंतर दोनवेळा तपासणी करण्यात आली. त्यानंतर वैâद्यांशीही विचारपूस झाली मात्र काही वैâद्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अप्पर पोलीस महासंचालक (तुरुंग) यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखेर दोन जेलर व चार कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सुभाष सोनवणे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.