
नवीन नांदेड| नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंतराव चव्हाण हे प्रचंड मताधिक्याने विजयी घोषित होताच महाविकास आघाडी पदाधिकारी व मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, नांदेड शहर महिला काँग्रेस आय अध्यक्षा डॉ. करुणा जमदाडे यांच्या सह प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हडको छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळया जवळ फटाक्यांची आतिषबाजी व मिठाई वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला.
नांदेड लोकसभा मतदार संघातुन महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे विजयी घोषीत करण्यात आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, ऊबाठा शिवसेना गट व संभाजी ब्रिगेड पदाधिकारी यांनी सिडको हडको भागासह विविध ठिकाणी जल्लोष साजरा केला, हडको व सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे,माजी नगरसेवीका तथा नांदेड शहर महिला काँग्रेस आय अध्यक्षा डॉ.करूणा जमदाडे, ऊबाठा गटाचे तालुका प्रमुख अशोक मोरे, संभाजी ब्रिगेडचे संकेत पाटील, ब्रिजलाल ऊगवे, निकिता शहापुरवाड, निवृत्ती जिकंलवाड,कृष्णा पांचाळ,साहेबराव मामीलवाड, आहाॅत खान पठाण,शेख हुसेन,गजानन शिंदे,देविदास कदम, संजय कदम, गजानन शिंदे, दिपक भरती,सोपान पांडे,दिपक देशपांडे,मयुर अमिल कंठवार,किशन रावणगाव कर, प्रभु ऊरूडवाड अरविंद शिंदे,एस.पि.कुंभारे,अशोक गोणारकर,शशिकांत हाटकर, प्रल्हाद गव्हाणे,शेख नुरोदीन, संदीप जिल्हेवाड,प्रमोद मैड, भगवान जोगदंड, विमल बाई चिते,भारती रणवीर,शरद पवार,मोहमंदी पटेल, साईदा पटेल,संगिता पवार,यांचा सह महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिडको येथील माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या संपर्क कार्यालय येथे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निवडीचे फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी उपमहापौर विनय पाटील गिरडे, माजी सरपंच अमोल गोडबोले,उपसरपंच सुदिन बागल,उपसरपंच नागेश वाघमारे,रवि रायबोळे रवि थोरात,कपिल नरवाडे राज कागडे, सुशिल लांडगे,मंगेश पांचपुजे,उपसरपंच दता कदम, रूपेश ढवळे,अवधुत अंबटवार, संभाजी देवसकर, मुन्ना कौलंबीकर, नितीन जौधंळे, शेख गौस, मुख्तार भई,सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा.वसंतराव चव्हाण यांच्या विजयाचा गोपाळचावडी येथे जल्लोष..
नवीन नांदेड:- गोपाळचावडी येथे युवक काँग्रेस उपाध्यक्ष रमेश तालीमकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड लोकसभा महा विकास आघाडीच्ये उमेदवार वसंतराव चव्हाण हे विजयी झाल्याबद्दल ढोल ताशा व फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये मिठाई वाटप करून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
४ जुन रोजी लोकसभा निवडणुक मतमोजणी प्रारंभ झाल्यानंतर महा विकास आघाडी उमेदवार वसंतराव चव्हाण हे प्रत्येक फेरी अखेर मताधिक्या वाढतच होते,अखेर विजयी घोषित होताच गोपाळचावडी येथे जल्लोष साजरा करण्यात आला, यावेळी उपसरपंच साहेबराव शेलुकर, अशिर्वाद डाकोरे, प्रदीप लाखे, किशन धुमाळ, महेश गुडेवार, टिपरसे मामा, नितिन कधारे, नवनाथ डाखोरे, हाणमंत मैलगे, अनिल धमने,अनिल फुले, सोनु पाचाळ,सजय शिंदे यांच्या सह पदाधिकारी युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
