
नांदेड/देगलूर| तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत व पिकविमा त्वरित 30 नोव्हेंबर पर्यंत वाटप करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज दि.28 नोव्हेंबर रोजी तहसीलदार यांना निवेदन देऊन तहसील कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
देगलूर तालुक्यात गेल्या जुन, जुलै महिन्यात झालेल्या ढगफुटी सददृश अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात खरीप हंगामातील सोयाबीन, तुर, मुग, उडीद, कापूस, आदी पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन 4 महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. शासनाने मदतही जाहीर करण्यात आला आहे दसरा, दिवाळी सण सुद्धा होऊन बराच कालावधी उलटून गेला आहे. अद्यापही शेतकऱ्यांना दुष्काळी मदत व 25/ टक्के अग्रीम रक्कम वाटफ न झाल्याने शेतकरी बांधवांना शारीरिक मानसिक, आर्थिक. अडचणीत वाढ झाली आहे.
अनुदान वाटप करण्यात आले नसल्याने असंतोष पसरला आहे. त्यामुळे त्वरित दुष्काळी मदत , पीकविमा वाटप करण्यात यावे अन्यथा तहसील कार्यालयास व पीकविमा कार्यालयास कुलूप लावून आमरण उपोषणाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व तहसील कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली .
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, शिवसेना मतदारसंघ समन्वयक नागनाथ वाडेकर, शहर प्रमुख बालाजी मैलागिरे, युवा सेना तालुका समन्वयक तथा शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख भागवत पाटील सोमुरकर, उपशहरप्रमुख बाबुराव मिनकीकर, युवा सेना तालुका समन्वयक सोशल मीडिया तालुकाप्रमुख, रवि. उल्लेवार युवा सेना शहर प्रमुख, संजय जोशी शिवसेना उपशहरप्रमुख, बाबुराव मिनकीकर आदीसह असंख्य पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थितीत होते.
