मेटामास्क अब्जावधीच्या मालमत्तेचे चोरी होण्यापासून संरक्षण करणार
मुंबई| मेटामास्क हे कन्सेन्सिसद्वारे विकसित जगातील आघाडीचे सेल्फ-कस्टडी वेब३ व्यासपीठ आणि ब्लॉकएड ही आघाडीची वेब३ सुरक्षा प्रदाता यांनी मेटामास्क विस्तारीकरणामध्ये प्रायव्हसी-प्रीझर्व्हिंग सिक्युरिटी अलर्ट्सच्या लाँचची घोषणा केली आहे. हे नवीन वैशिष्ट्य मेटामास्कला स्थानिक सिक्युरिटी अलर्ट्स एकीकृत करणारे पहिले सेल्फ-कस्टडी वेब३ वॉलेट बनवते. हे अलर्ट्स सक्रियपणे मालिशियल व्यवहारांचे संरक्षण करतात, तसेच वापरकर्त्यांचे घोटाळे, फिशिंग व हॅक्सपासून संरक्षण करण्यासह त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करतात. मेटामास्क व ब्लॉकएड यांच्या मते, जागतिक स्तरावर सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असलेल्या या प्रायव्हसी-प्रीझर्व्हिंग सिक्युरिटी अलर्ट्सचा अब्जावधी मालमत्तेचे चोरी होण्यापासून संरक्षण करण्याचा मनसुबा आहे.
मेटामास्क प्रायोगिक सेटिंग अंतर्गत डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी निवड करण्याच्या क्षमतेसह याचे अधिकृत लॉन्च ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले. नोव्हेंबरमध्ये मेटामास्क मोबाइल अॅपवर हे वैशिष्ट्य सुरू होईल. २०२४ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत, हे नवीन वैशिष्ट्य एकसंधीपणे एकीकृत केले जाईल आणि डिफॉल्टनुसार वॉलेटमध्ये सक्षम केले जाईल, तसेच मेटामास्कच्या वापरकर्त्यांसाठी ते १०० टक्के उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
गोपनीयतेबाबत तडजोड न करता सुरक्षितता वाढवणारे पहिले वॉलेट: बहुतांश वेब३ वॉलेट्स सिक्युरिटी अलर्ट्स देण्याकरिता प्रमाणीकरणासाठी थर्ड पार्टीसह वापरकर्त्यांचा व्यवहार डेटा शेअर करण्यावर अवंलबून आहेत. याउलट, मेटामास्क व ब्लॉकएड यांनी अद्वितीय प्रायव्हसी-प्रीझर्व्हिंग मॉड्यूल तयार केले आहे, जे प्रभावीपणे व्यवहारांना एकत्र करते, तसेच बाह्य पार्टींना प्रत्येक व्यवहार व स्वाक्षरी विनंती शेअर करण्याची गरज दूर करते. उल्लेखनीय बाब म्हणजे भारत आता जागतिक स्तरावर वापरकर्त्यांच्या संदर्भात मेटामास्कसाठी दुसरा सर्वात महत्त्वाचा देश आहे.
मेटामास्कचे सह-संस्थापक आणि कन्सेन्सिस येथील चीफ इथोज ऑफिसर डॅन फिन्ले म्हणाले “या स्थानिक प्रायव्हसी-प्रीझर्व्हिंग सिक्युरिटी अलर्ट्ससह मेटामास्क वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यासह वेब३ इकोसिस्टममध्ये गोपनीयतेचे जतन करणाऱ्या सुरक्षिततेसाठी नवीन मानक देखील स्थापित करत आहे. गोपनीयता हे वेब३चे मुलभूत मूल्य आहे आणि वापरक्षमता वाढवण्यासाठी त्याबाबत तडजोड करू नये. त्याऐवजी, ते क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सोल्यूशन्सच्या विकासामधील मार्गदर्शक तत्त्व असले पाहिजे. आम्ही नवकल्पना आणण्यासह वापरकर्त्यांना सक्षम करण्याप्रती आणि त्यांना आत्मविश्वासाने वेब३ विश्वात प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेली साधने प्रदान करण्याप्रती कटिबद्ध आहोत.”