![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2023/10/hadgao.jpg)
हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव तालुक्यातील मनाठा या गावी नविन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर झाल्याच पञ महाराष्ट्राचे सहसचिव आशोक आञाम यांनी नुकतेच जरी केले आहे. या बाबतीत माञ विद्यमान आमदार व खासदार यांचे श्रेय घेण्याची चढाओढ लागली असल्याची दिसुन येत आहे. माञ या बाबतीत स्थानिक माध्यमासमोर कुणीही समोर येत नाहीत.
हदगाव विधानसभा क्षेञाचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर असा दावा केला आहे की, हदगाव तालुक्यातील मौजे मनाठा तालुका हदगाव येथे जे नवीन प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या मंजुरी करिता विद्यमान आमदार यांच्या सततच्या पाठपुराव्या मुळेच नवीन प्राथमिक आरोग्य केद्रास मंजुरी मिळाली. तर दुसरी कडे शिदे गटाचे हिगोली लोकसभाचे खा. हेंमत पाटील यांच्या माध्यमातून हदगाव विधानसभा क्षेञाचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या सततच्या प्रयत्नाने मनाठा या गावी नवीन प्राथमिक आरोग्य केद्रास मान्यता मिळालेली आहे.
त्यांच्या समर्थकांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी प्राथमिक आरोग्य केद्राविषयी केलेला पञव्यव्हारच सोशल मिडीयावर टाकलेला आहे. यामुळे आता विद्यमान आमदार समर्थाकडुन या प्राथमिक आरोग्य केद्राबाबतीत आमदारांचे काय म्हणने आहे हे अपेक्षित आहे. याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. अणखी विशेष म्हणजे आमदार व खासदारांचे समर्थक आता या बाबतीत त्यांची नेमकी पुढील भूमिका काय आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर 1995 साली युती सरकारच्या काळात तत्कालीन आ. सुभाष वानखेडे यासाठी प्रयत्नशील होते. तत्कालीन आरोग्यमंत्री दौलतराव आहेर हे भाजपचे होते. तत्कालीन भाजपचे पदाधिकारी यांनी हे आरोग्य केंद्र बरडशेवाळा येथे स्थापन करण्यासाठी आग्रह धरला. कदाचित तेव्हाचा प्रस्ताव मार्गी लागला असेल असही माजी खा सुभाष वानखेडे यांच्या समर्थकाचे म्हणने आहे.
![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2023/11/Hardweyar-Nagu.jpg)