नांदेड| नांदेड – महावितरण मधील वर्ग 4 च्या कर्मचार्यांना शैक्षणिक आहारतेनुसार त्यांचे वर्ग 3 मध्ये वर्गीकरण करण्यात यावे या व अन्य मागण्यासाठी लाईन स्टाफ बचाव कृती समितीच्या वतीने आज दि. 20 ऑक्टोबर रोजी महावितरणच्या मंडळ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ कर्मचार्यांचे कामाचे तास निश्चित करावे, लाईनस्टाफ कर्मचार्यांचे कामाचे स्वरूप निश्चित करावे, वाहतूक इंधन भत्ता 20 लिटर देण्यात यावा, स्वतंत्र वेतन श्रेणी देण्यात यावी, वसुली हे काम सांघिक स्वरूपाचे असल्याने जबाबदारी निश्चित करण्यात यावी, सुरक्षित साधने व मेंटेनन्स करता योग्य साहित्य पुरविण्यात यावे, कंत्राटी पद्धतीने नोकर भरती न करता सरळ सेवा भरतीने नोकर भरती करण्यात यावी या व अन्य मागण्यांसाठी लाईनस्टाफ बचाव कृती समितीच्या वतीने महावितरणच्या मंडळ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे मंडळ अध्यक्ष सलीम शेख जानीमिया, विभागीय सचिव गजानन पेनलोड, इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशनचे क्षेत्रीय अध्यक्ष इश्वरसिंघ टेलर, मंडळ अध्यक्ष गजानन कुरुडे, क्रांतीकारी लाईनस्टाफ सेनेचे केंद्रीय संघटक प्रकाश कायपलवाड, महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे क्षेत्रीय सचिव विजय रणखांब, महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेचे क्षेत्रीय सचिव बालाजी स्वामी, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे प्रादेशिक सल्लागार भाई प्रकाश वाघरे, मंडळ अध्यक्ष शोभा येळणे, मंडळ सचिव सुनिल टिप्परसे आदीसह असंख्य लाइन्स्टाफ कर्मचारी सहभागी झाले होते.