अन्नपूर्णा माता मंदिरात मोफत अकुप्रेसर शिबीर उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे हस्ते
नांदेड। पूजा हेल्थकेअर सेंटर सिडको नांदेड च्या वतीने नवरात्र महोत्सवा निमित्याने अन्नपूर्णा माता मंदिर वडेपुरी ता. लोहा जी.नांदेड येथे वात विकार, गुडघे दुःखी, कंबर दुखी,मान दुःखी, या वर सूजोक तज्ञ डॉ.संभाजी अवधुतराव पवार यांच्या माध्यमातून उपचार शिबिर घेण्यात आले या वेळी 200 रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे हस्ते करण्यात आले.
नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असणारे सूजोक तज्ञ डॉ.संभाजी पवार यांच्या पूजा हेल्थकेअर सेंटर सिडको आणि अन्नपूर्णा माता ट्रस्ट च्या संयुक्त विधमाने वडेपुरी येथील अन्नपूर्णा माता मंदिर येथे रविवार दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी गुडघे दुःखी, कंबर दुखी, मान दुःखी या आजारावर सूजोक अकुप्रेसर द्वारे शिबिर घेण्यात आले या शिबिरात 200 पेक्षा जास्त रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आम् आदमी पार्टी नांदेडचे फाऊंडर नरेंद्रसिंघ ग्रंथी, युवा जिल्हाध्यक्ष आदिल जहागीरदार, प्रवक्ते ॲड.जगजीवन भेदे, सचिव डॉ अवधुत पवार तसेच ट्रस्ट च्या अधेक्षा सौ.सुषमा गहिरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरासाठी मुख्य सहकार्य ह.भ. प. पांडुरंग महाराज तोरणे, मसाज तज्ञ बालाजी लिंबापुरे, प्रवीण जाधव, अरविंद जाधव,कुणाल लोखंडे, विशाल येरावार,प्रथमेश देशमुख, सूरज सूर्यवंशी यांचे लाभले.