नांदेडसोशल वर्क

नांदेड पोलीस दलाकडुन पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीदांना अभिवादन

नांदेड। दिनांक 21 ऑक्टोबर 1959 रोजी हिमालयातील लडाख जवळ असणान्या हॉट स्प्रिंग’ या सोळा हजार फुट उंचावर असणाऱ्या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे जवान गस्त घालत असतांना अचानक चीनी सैन्याकडुन गोळीबार सुरू होवुन त्यांनी केलेल्या अनपेक्षित हल्ल्याला तोंड देतांना दहा जवान धरातीर्थी पडले. तेव्हा पासुन 21 ऑक्टोर हा दिन ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जातो.

कायदा व सुव्यवस्था राखने, नागरीकांचे जिवीताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे ही कर्तव्य बजावत असतांना पोलीस दलातील अनेक अधिकारी व अमलदार यांना प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती दयावी लागते. अशा प्रकारे विरगती प्राप्त झालेल्या अधिकारी / अमलदारांना श्रदांजली वाहण्यासाठी त्यांचे स्मरणार्थ आज दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी आपण पोलीस स्मृतीदिन पाळत आहोत.

आजचा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा आहे. यावर्षी देखील संपुर्ण भारतातुन 189 पोलीस अधिकारी / अमलदारांनी आपले कर्तव्य बजावत असतांना आपल्या मातृभुमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिलेली आहे. आपले कर्तव्य बजावताना आजपर्यंत ज्यांना विरगती प्राप्त झाली त्या सर्व हुतात्म्यांना श्रद्वांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन श्रीमती निती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड व प्रमुख उपस्थिती महणुन मा. श्री. योगेश कुमार, पोलीस अधिक्षक नागरी हक्क सरंक्षण विभाग नांदेड, मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. डॉ. महेशकुमार डोईफोडे, मनपा आयुक्त, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड मा. श्री. गौहर हसन, सहाय्यक पोलीस अधिक्षक नांदेड ग्रामीण, मा. श्री महेश वडदकर, निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड, श्रीमती स्नेहल कोकाटे मॅडम, मा. श्री सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर, मा. श्री. मारोती थोरात. उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार, मा. श्री. सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा नांदेड, मा. श्री. जगताप, प्रो पोलीस उप-अधिक्षक नांदेड, मा. श्री द्वारकादास चिखलीकर, पोनि स्थागुशा मा. श्री. विजय धोंडगे, रापोनि पो. मु. नांदेड, मा. श्री. शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी नांदेड शहरातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित राहुन पोलीस मुख्यालय नांदेड येथील स्मृती स्मारकास पोलीस अधिकारी व अंमलदारांनी शहीदाना अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण करून, शहींदाना मानवंदना देवुन पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन सपोउपनि श्री विठठल कत्ते यांनी केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!