नांदेडराजकिय

२४ कोटीतून तेलंगणा बॉर्डरपर्यंत रस्ता पावसाळ्यापूर्वी होणार – आ. माधवराव पाटील जवळगावकर

हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरासह ग्रामीण भागातील जनतेसाठी महत्त्वाचे पक्के रस्ते शहरातील नाल्याची कामासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला असुन, आवश्यक त्या कामाना प्रथम प्राधान्य देऊन जनतेला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. तसेच तेलंगणा बॉर्डरपर्यंतचा रस्ता देखील मंजूर झाला असून, २४ कोटीतून हा रस्ता पावसाळ्यापूर्वी दर्जेदार पद्दाथीने पूर्णत्वाला जाणार आहे. यामुळे तेलंगणा – महाराष्ट्रातील नातेवाईकांचे नातेसंबंध आणखी दृढ होण्यास मदत मिळणार आहे. आणखी बरीच रस्ते व नाल्याची कामे करण्यासाठी मी कटिबद्ध असून, मी पदावर असे पर्यंत विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिली.

ते हिमायतनगर शहरातील नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या रस्ते व नाली बांधकाम तसेच हिमायतनगर ते वाशी पर्यंतच्या रस्त्याच्या कामाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी वार्ड क्रमांक 01 ते 02 मध्ये पद्मशाली समाज स्मशानभूमी ते नडवा पुलापर्यंत नाली बांधकाम, वार्ड क्रमांक 10 मध्ये रामदास रामदिनवार यांच्या घरापासून नडवा पुलापर्यंत रस्ता व नाली. तसेच तालुक्यातील एकंबा, सिरपली, पळसपूर, हिमायतनगर ते पार्डी, रस्त्याची पुलमोऱ्यासह सुधारणा करणे यासह अन्य कामाचे नारळ फोडून आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना दिवाळी भेट दिली आहे.

या उदघाटन सोहळ्यात शासकीय गुत्तेदार सुरेश पळशीकर, बांधकाम विभागाचे अभियंता डांगे यांनी आ. जवळगावकर यांचा सत्कार केला. या वेळी बोलताना आ. जवळगावकर म्हणाले की, शहरातील जनतेला विकास कामाचे दिलेल्या आश्वासन या कामाच्या माध्यमातून पुर्ण होत आहेत. या बरोबरच एकघरी ते हिमायतनगर पळसपूर, एकंबा या रस्त्याच्या कामाची दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला रस्त्यामुळे होणारी दुरावस्था आता दुर होणार आहे.

बांधकाम विभागाने सदरील कामे दर्जेदार कसे होतील याकडे लक्ष देऊन तेलंगणा भागातून येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले पाहिजे असे कामे व्हावेत आणि भविष्यात शहरासह ग्रामीण भागातील राहिलेली विकास कामे मार्गी लागणार असल्याचे आ. जवळगावकर म्हणाले. यावेळी मुख्याधिकारी ताडेवाड, सुभाष राठोड, प्रथम नगराध्यक्ष अ. आखील अ. हमीद, तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, कृउबाचे सभापती जनार्दन ताडेवाड, संचालक सुभाष शिंदे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, शहराध्यक्ष संजय माने, माजी सभापती डॉ.प्रकाश वानखेडे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान, दिलीप पाटील लोहरेकर, संदीप पळशीकर, नाथा पाटील, बाळू अण्णा चवरे, नितेश जैस्वाल, योगेश चिलकावार, अ. बाकी, डॉ.पुपलवार, रामराव पाटील, सचिन माने, पंडित ढोणे, यांच्यासह शहरातील कांग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुरेश पळशीकर यांनी मानले.

सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असताना हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी विविध कोट्यवधींच्या निधीतून विकास कामांचा शुभारंभ करून हिमायतनगर शहरवासीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. या रस्त्याच्या कामामुळे हिमायतनगर शहर परिसर आणि ग्रामीण भागातून ये – जा करणाऱ्या नागरिकांना गेल्या शेकडो वर्षांपासून रहदारीसाठी होणार खड्डेमय रस्त्याचा अडथळा दूर होणार आहे. आगामी काळात तेलंगणा बॉर्डरपर्यंतचा रस्ता पूर्ण होऊन तेलंगणा आणि महाराष्ट्रातील नातेसंबंध आणखी दृढ होण्यास देखील मदत मिळणार आहे. अश्या शब्दात आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचे कौतुक करत सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी शहर व ग्रामीण भागातील गावकरी जनतेच्या वतीने आभार मानले.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!