ज्ञानतीर्थ युवक महोत्सवातील नृत्याविष्कारातून प्रकटले दुर्गा, कृष्ण आणि नरसिंह
नांदेड | ज्ञानतीर्थ युवा महोत्सव 2023 पं. कुमार गंधर्व मंचावर दिनांक 14/10/2023 वार शनिवार रोजी सकाळी शास्त्रीय नृत्य या कलाप्रकरात एकुण 6 स्पर्धकांनी आपली कला सादर केली. यात एम जी एम कॉलेज नांदेड च्या मधुरा राजूरकर ने नृत्याविष्कार द्वारे विविध भावमुद्रा सादर केल्या.
दयानंद कला महाविद्यालय लातूरच्या ऋचा कुलकर्णीने आपल्या भाव भरतनाट्यम या नृत्य प्रकारातून महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण हा प्रसंग प्रेक्षकांसमोर जिवंत केला व कृष्णाचे दिव्यदर्षन उपस्थितांना घडविले.
तसेच दयानंद वाणिज्य महाविद्यालय,लातूर च्या ऋतुजा सुर्यवंशी,लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद च्या अभिज्ञा मनुरकर, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर च्या गायत्री सुतार यांनी आपल्या नृत्यातू न दुर्गांचे व जयक्रांती महाविद्यालय, लातूरच्या सूरज सुर्यवंशीने नृसिंहाचे दर्शन घडविले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्थानिक व्यवस्थापन समिती या नात्याने प्रा. चांदेश्वर यादव, प्रा दिनेश जोशी, प्रा प्रेमसागर मुंदडा, प्रा. कल्याणी पाटिल, प्रा. निकिता अग्रवाल, श्री बाचाते यानी कार्य केले.