वाढोणा नगरीची कुलस्वामिनी माता कालिंकादेवी मंदिरात रविवारपासून नवरात्रोत्सवाची धूम…
हिमायतनगर,परमेश्वर काळे| प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर (वाढोणा) नगरीची कुलस्वामिनी माता कालिंका देवी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा १९४५ दि.१५ ऑकटोबर पासून नवरात्रोत्सवाची धूम सुरु होणार आहे. सकाळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिषेक, अलंकार सोहळा प्रमुख अतिथी राजू चाटलेवार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. ९ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात तमाम महिला, पुरुष भक्तांनी सहभागी होऊन शोभा वाढवावी असे आव्हान कालीन्का माता मंदिर कमेटीच्या वतीने न्यूजफ्लॅश३६०डॉटईनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १९४५ दि.१५ रवीवारी माता कालिंका देवीचा महाभिषेक व अलंकार सोहळा सकाळी ९.१५ मिनिटांनी हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख अतिथी राजू चाटलेवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच सात दिवस दररोज दुपारी २ ते ५ दरम्यान संगीतमय देवी भागवतपुराण कथेचे आयोजन कै. पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या स्मरणार्थ करण्यात आले असून, प्रवचनकार हभप.बाबुराव महाराज तेरकर यांच्या मधुर वाणीतून उपस्थित भाविकांना कथा सांगितली जाणार आहे. दि.१९ रोजी रात्री ९ ते १२ या दरम्यान गोंधळ आरती होणार असून, नवरात्र उत्सवात नऊ दिवस दररोज भव्य भांडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्ष राजुशेठ जयस्वाल यांनी दिली.
घटस्थापना दिनी सकाळी मुख्य पुजारी साईनाथ बडवे व कांता गुरू वाळके यांच्या मधुर वाणीतून अभिषेक अलंकार सोहळा संपन्न होणार आहे, या कार्यक्रमाचे व्यवस्थापन सौ.सुनंदा दासेवार, सौ.प्रेमाला गुंडेवार, सौ.प्रतिभा नप्ते,सौ.पार्वतीबाई रच्चेवार यांच्याकडे सायोपविण्यात आले आहे. तसेच नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवस पुरोहित श्री कांतागुरू वाळके यांच्या मधुर वाणीतून सप्तसीती पाठाचे पठण होणार आहे. दररोज नित्यनेमाने सकाळी संध्याकाळी ७ वाजता मातेची महाआरती होणार आहे. नवमी रोजी दि.२३ सोमवारी सकाळी १० ते ०१ वाजेच्या दरम्यान काल्याचे कीर्तन त्यानंतर माता कालिंका देवीला प्रसन्न करण्यासाठी होमहवन, महाअभिषेक पूर्णाहुती दिली जाणार आहे. त्यांनतर दि.२४अक्टोबर रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत विजयादशमी (दसरा) मिरवणूक ढोल तश्याच्या गजरात पारंपरिक पद्धतीने काढली जाईल. दररोज रात्री ७ ते ८ या वेळेत या ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या माता दुर्गादेवीची महाआरती केली जाणार आहे.
नवरात्रोत्सवात संपन्न होणार्या या कार्यक्रमाचा लाभ सर्व महिला – पुरुष भक्तांनी घ्यावा असे आव्हान मंदिर कमेटीचे अध्यक्ष राजेंद्र रामदिनवार, उपाध्यक्ष दिलीप पार्डीकर, सचिव संजय मारावार, सहसचिव रामकृष्ण मादसवार, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर पंदलवाड, सल्लागार शरद चायल, गजानन तीप्पणवार, धर्मपुरी गुंडेवार, नारायण गुंडेवार, जीवन घोगारकर, शिवाजी भंडारे, राजू जैस्वाल, आशिष सकवान, विजय मादसवार, राजू चाटलेवार, संतोष रेखावार, योगेश चीलकावार, विनोद गुंडेवार, सौ.प्रेमाला गुंडेवार, सौ.प्रतिभा नप्ते, सौ.पार्वतीबाई रच्चेवार, सौ.उषा देशपांडे, सौ.संगीता साखरकर व समस्त गावकरी मंडळीनी व नवरात्र महोत्सव समितीचे मनोज मादसवार व इतर सर्व सदस्यांनी केले आहे.