गणेशोत्सवा प्रमाणे दुर्गादेवी महोत्सव शांततेत साजरा करावा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक
नवीन नांदेड। गणेशोत्सव प्रमाणे दुर्गादेवी महोत्सव शांततेत साजरा करून सहकार्य करावे व ऊतम गुणात्मक मधुन सर्वोत्तम निवड म्हणजे स्पर्धा असल्याचे गणेश मंडळानी दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिल कुमार नायक यांनी गणेशोत्सव स्पर्धा सोहळा प्रसंगी केले.
ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड व एकता प्रबोधन मंच सिडको यांच्या वतीने आयोजित श्री गणेश दर्शन स्पर्धा २२/२३ पारितोषिक वितरण सोहळा सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दि. १३ आक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता, यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिल कुमार नाईक, ऑड.सतिश पुंड,यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती.
ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत या वर्षी एकुण ११४ गणेश मंडळांनी नोंद केली होती, पारितोषिक साठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,यात शहरी व ग्रामीण भागातून शोभायात्रा, विविध देखावा,ऊपक्रम यासह अनेक उपक्रमसाठी परिक्षक नेमणूक करण्यात आली होती,यात ग्रामीण भागाती प्रथम देशभक्ती वर आधारित देखावा साठी जय महाराष्ट्र गणेश मंडळ बळीरामपुर,तर दुसरे श्री लक्ष्मी व्यंकटेश गणेश मंडळ पॉवरलुम बळीरामपुर,तिसरा लालवांडी गणेश येथील गणेश मंडळ तर शहरी भागात शोभायात्रा साठी राजस्थानी गणेश मंडळ सिडको,दुसरे शिव गणेश मंडळ हडको,रिध्दीसिध्दी गणेश मंडळ सिडको, श्री. गणेश दर्शन शहरी मध्ये ओकांर गणेश मंडळ हडको तर महाराणा प्रताप गणेश मंडळ हडको, तिसरा आदर्श गणेश मंडळ सिडको तर ग्रामीण भागातून जय शिवराय गणेश मंडळ तुप्पा प्रथम,दुसरा आझाद गणेश मंडळ काकांडी,तर तिसरे हारी ओम गणेश मंडळ विणकर वसाहत दुधडेअरी,धनेगाव यांना देण्यात आले,यांना मान्यवरांचा हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले,या स्पर्धा साठी परिक्षक म्हणून डॉ.नरेश रायेवार,शेख निजाम गंवडगावकर, सौ.ज्योती कदम, यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी केले, यात ग्रामीण व शहरी भागातील गणेश मंडळ पदाधिकारी यांनी गणेशोत्सव काळात केलेल्या सहकार्य बदल सामाजिक,राजकीय ,शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी नागरीक यांनी केलेल्या सहकार्य बदल आभार व्यक्त केले,तर सूत्रसंचालन ,आभार बालाजी गवाले यांनी केले.
या सोहळ्याला यंकोबा येडे, वैजनाथ देशमुख ,विनोद कांचनगिरे, अशोक मोरे,सतिश बसवदे,दलितमित्र नारायण कौलंबीकर, माधव अंबटवार,शेख मोईन लाठकर,सरपंच प्रतिनिधी मुन्ना पांचाळ,देविदास कदम,एस.पी.कुंभारे, राजु टमना, पप्पू गायकवाड,मयुर वर्मा,विनोद जाधव, यांच्या सह गणेश मंडळ पदाधिकारी, सामाजिक, राजकीय, पक्षाचे पदाधिकारी यांच्यी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाचक शाखेचे बालाजी दंतापले, चंद्रकांत बिरादार यांच्या सह पोलीस अमंलदार यांनी परिश्रम घेतले.