नव्याने नांदेड येथे होत असलेल्या कृषी महाविद्यालयास कै.पद्मश्री श्यामरावजी कदम यांचं नाव द्या
नांदेड| सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कन्हैया कदम यांनी भेट घेऊन मराठवाडाचा विकासाचा अनुशेष दूर करण्याचा हेतून छ.संभाजीनगर येथे 16 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत १४६ कोटी 54 लाख रुपयाचे कृषी महाविद्यालय मंजूर केल्या बद्दल आभार मानले.
व नांदेड ज़िल्हाची ओळख देशभर पोहोचणारे नांदेड ज़िल्हापरिषेदेचे पहिले अध्यक्ष , नांदेड ज़िल्हा मध्यवर्ती बँकेचे पहिले अध्यक्ष , एक साथ 52 संस्थेचे अध्यक्ष पद भूषवत देशात विक्रम केलेले माजी मंत्री कै.पद्मश्री श्यामरावजी कदम यांचे नाव नवीन होऊ घातलेल्या कृषी महाविद्यालयास द्यावे. तसेच कै.पद्मश्री श्यामरावजी कदम यांनी कृषी,शिक्षण,सहकार या क्षेत्रांत केलेल्या कार्याची दखल घेत तत्कालीन केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री ही पदवी देऊन गौरव केलेल्या आहे .त्यांनी शेकडो संस्था उत्तम व पारदर्शक रित्या सांभाळल्या त्यांनी राज्यभरातील हजारो गरजू लोकांना या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून नोकऱ्या लावून त्यांना रोजगार मिळवून दिला म्हणून नांदेड येथे होत असलेल्या कृषी महाविद्यालयास कै.पद्मश्री श्यामरावजी कदम यांचं नाव द्यावे असी मागणी प्रदेश उपाध्यक्ष कन्हैया कदम यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कडे केली.