नांदेड। नांदेड पंचायत समिती येथील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई-136 च्या अध्यक्षपदी रणजित हाटकर,तर सचिवपदी रामोड व कार्याध्यक्ष मुदखेडे व महिला संघटक सिमा मुगावकर या नवीन कार्यकारणीची बिनविरोध निवड जिल्हाध्यक्ष धनंजय वडजे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती, नांदेड येथे दि.11 आक्टोबर 23 रोजी आयोजित करण्यात आली .
या वेळी जिल्हा सचिव हणमंत वाडेकर कार्याध्यक्ष श्रीनिवास मुगावे कोषाध्यक्ष शिवराज तांबोळी सहसचिव सुदर्शन कपाळे, बिलोली तालुका अध्यक्ष धम्मा धोत्रे, टी.जी. रातोळीकर, नायगांव तालुका अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशान्वये निवडणुकीस सुरूवात करण्यात आली यावेळी मार्गदर्शन करतांना सभागृहातील सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचे निवडणुकीची यादी वाचन करण्यात आले, या नंतर अध्यक्ष पदाकरिता आर.एस.हाटकर,सचिव एस.जी. रामोड, कार्याध्यक्ष आर.एल.मुदखेडे, महिला संघटक म्हणुन श्रीमती सिमा मुगावकर हे बिनविरोध निवडुण आल्याचे अध्यक्षाने जाहिर करण्यात आले.
यानंतर पुढील कार्यकारणी मानद अध्यक्ष एस.बी.बोडके, कोषाध्यक्ष एम.बी.बंडावार,उपाध्यक्ष मारोती वाघमारे, एस.व्ही.वाकोरे, आय.एम.गुरमे, टि.एन.केंद्रे, महिला उपाध्यक्ष वर्षा पाटिल, सहसचिव मिनाक्षी मुंगल, सल्लागर जे.व्ही. टोकले,जी.एन.सहदेव,संघटक महेश्वर जाधव आणि ए.बी.कटके तर प्रसिद्धी प्रमुख म्हणुन शेख अझर शेख जलील यांची निवड झाली. सदरील निवड प्रक्रियेत विठ्ठल सुर्यवंशी, प्रकाश भदरगे, ए.ए.भिसे, अरुण दुधमल, रमेश कदम, कुणाल पा.सुकळकर, माधव देवडे, यांनी विशेष परिश्रम घेतले तर आभार प्रदर्शन टोकले यांनी केले.