नांदेडराजकिय

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा दानशूरपणा चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दिली दोन एकर जागा

नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कंधार तालुक्यातील चिखली येथे नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्रास मान्यता दिली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यासाठी जागेची मोठी समस्या होती, ही समस्या खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्वतःची दोन एकर जागा देऊन दूर केली. खा. चिखलीकरांनी हा दानशूरपणा दाखवल्याबद्दल कंधार तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. आज प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सदरील जमिनीचे दानपत्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

चिखली व परिसरातील नागरिकांसाठी चिखली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. या मागणीची दखल घेऊन खा. चिखलीकरांनी पाठपुरावा केला आणि त्याचे फलित म्हणून नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने चिखली येथे नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता दिली. आरोग्य केंद्रास मान्यता मिळाल्यानंतर या केंद्राची इमारत कुठे बांधावी, असा प्रश्न निर्माण होऊन जागेची समस्या होती.

त्यामुळे खासदार चिखलीकर यांनी चिखली व परिसरातील नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सुविधा मिळावी,या हेतूने त्यांनी आपल्या मालकीची चिखली येथील गट क्रमांक 132 मधील 80 आर ही दोन एकर जागा या आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यासाठी दान म्हणून दिली. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार असून त्याचा लाभ चिखली व परिसरातील नागरिकांना होणार आहे. ग्रामीण भागात हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होत असल्याने आणि खासदार चिखलीकर यांनी या आरोग्य केंद्रासाठी स्वतःच्या मालकीची जागा दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून आभार मानले जात आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!