सध्याच काळ पञकार करिता फार कठीण – जेष्ठ पञकार गोवर्धन बियाणी
हदगाव, शे.चांदपाशा| सध्याची परिस्थिती पञकार करिता फार कठीण संघर्षमय झालेली असुन, या करिता पञकारानी आपले स्थानिक पातळीवरील व्यक्तिगत मतभेद विसरुन एकजूट दाखविणे ही काळाची गरज आहे. गटातटात जायला आपण काही राजकीय नेते नसुन असे अहवान अखिल भारतीय मराठी पञकार संघाचे नादेड जिल्हाअध्यक्ष व जेष्ठ पञकार गोवर्धन बियाणी (भाऊ) यांनी केलं.
ते हदगाव शहरातील सुमन गार्डन मध्ये पञकाराच्या तालुका कार्यकारिणीच्या बिनविरोध निवडीच्या वेळी मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी तालुक्यातील व जिल्ह्यातील जेष्ठ पञकारांची उपस्थिती होती. पञकार संघटनेची बिनविरोध निवड झाल्यावर समाधन व्यक्त करतांना ते पुढे म्हणाले की, पञकारांनी पञकारिता करतांना आपल्या परिवाराची काळजी घेणे फार आवश्यक आहे.
या सोबत पञकारांनी जोडधंदा करणे अवश्यक असुन, या करिता काहीच कमीपणा नाही. याकरिता त्यांनी बचतगट सारखे पर्याय सुचविले कोणत्याही प्रशासकीय कार्यालय मध्ये माहीती घेत आसतांना फार काळजी घ्यावी. आपली चुक होणार नाही याची काळजी घेऊन सर्वसमानयना न्याय मिळवून देण्यासाठी लेखणीचा वापर करावा. तालुका पातळीवर पत्रकारांचा विमा आसणे अवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी जेष्ठ पञकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले बैठकीला शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील पञकार बहुसंख्य ने उपस्थित होते.