डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गत 24 तासात 100 रुग्ण बरे होऊन परतले घरी
नांदेड। येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकुण 1 हजार 165 रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 726 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. रुग्णालय परिसरातील अस्वच्छता आवारात डुकरांचा मोकाट वावर दिसतो आहे.
मागील 24 तासात म्हणजेच दि. 8 ऑक्टोंबर ते 9 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण 191 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात 100 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, याचबरोबर या 24 तासात 11 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात बालक 1 (स्त्री जातीचे 1) व प्रौढ 10 (पुरुष जातीचे 6, स्त्री जातीचे 4) यांचा समावेश आहे.
गत 24 तासात एकूण 48 शस्त्रक्रिया झाल्या. यात 35 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 13 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील 24 तासात 24 प्रसुती करण्यात आल्या. यात 7 सीझर होत्या तर 17 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मागीलकाही दिवसांपासून येथे होत असलेल्या मृत्यूंमुळे चर्चेत आलेआहे. ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे हा रुग्णालयाचा परिसर आहे की डंपिंग ग्राउंड हेच कळत नाही. रुग्णालय परिसरातील अस्वच्छता आवारात डुकरांचा मोकाट वावर दिसतो आहे. रुग्णालयात दररोज सरासरी ७०० च्या वर रुग्णांवर उपचार होत असले तरी याच आवारात जवळपास रुग्णापेक्षा जास्त डुकरे मोकाट फिरताना पाहावयास मिळत आहेत.
रुग्णांच्या नातेवाइकांकडून उरलेले शिळे अन्नरुग्णालय परिसरात उघड्यावर टाकले जात असल्याने येथे डुकरे व कुत्र्यांचा सुळसुळाट असल्याचे बोलले जात आहे. या रुग्णालयात नांदेडसह परभणी, हिंगाेली,यवतमाळ व तेलंगणातील रुग्णउपचारासाठी दाखल होतात. रुग्णालयाच्या आवारात रुग्णांचे नातेवाईक जेवण करण्यासाठी बसतात. मोकाट फिरत असलेली डुकरे आमच्या ताटामध्ये तोंड घालूनअन्न नास करत असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगत आहेत.