नांदेड| खा.हेमंत पाटील यांच्यावर दाखल झालेल्या खोट्या अँट्रासिटी व ३५३ च्या गुन्हा संदर्भात समर्थन देण्यासाठी ज्यांनी आपल्या आप्तेष्टांना गमावलं आहे त्यांच्या भावनांना त्यांना न्याय देण्यासाठी आज तिरंगा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.
नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यूकांडाच्या घटनेनंतर खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय रूग्णालयात धाव घेत अतिगंभीर असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांची भेट घेवून त्यांना धीर दिला. तसेच रूग्णालयातील अधिकारी, डॉक्टरांकडून सद्यस्थितीतील परिस्थितीची माहिती घेतली. तद्नंतर रूग्णालयातील स्वच्छतागृहांची पाहणी करताना स्वतः अधिष्ठाता यांचेच स्वच्छतागृह अत्यंत घाणेरड्या अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी जाब विचारताच अधिष्ठाता डॉ.वाकोडे यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाहीत.
म्हणून खा.हेमंत पाटील यांनी अधिष्ठाता अन् अधिकाऱ्यांना सोबत घेऊन *”दोघे मिळून स्वच्छ करु”* असे आवाहन करुन स्वच्छतागृह साफ केले. या घटनेनंतर राज्यभरातील डॉक्टरांनी संताप व्यक्त केला आणि डॉ.वाकोडे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दिवसेंदिवस मृत्यू संख्येत वाढ होत आहे. त्यात नुकतीच जन्मलेल्या बालकांपासून ते वयोवृद्धा पर्यत असंख्य लोक जगण्याची आशा घेऊन रुग्णालयात दाखल होतात पण अस्वच्छता व दुर्गंधीमुळे मृत्युमुखी होण्याची प्रमाणात वाढ होत आहे. एकीकडे आज नुकताच स्वच्छता अभियानाचा समारोप होत आला तरीदेखील ही अस्वच्छता कायम अन् दुसरीकडे आजवरच्या मृत्यू लोकांच्या आप्तेष्टांना धीर द्यायचं सोडून हा राजकीय अट्टाहास मोडीत काढण्यासाठी संतापग्रस्त रुग्णांची नातेवाइक व नागरिकांमध्ये सदरील घटनेसंदर्भाने रोष व्यक्त केला जात आहे.
नांदेड येथील शासकीय रूग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेने आजवर तब्बल ८५ जणांचे बळी घेतले आहेत. त्यामध्ये २५ नवजात बालकांचा समावेश आहे. अतिदक्षता विभागातील घाण, एससी, पंखे बंद अशा अस्वच्छता मुळेच मृत्यूचा आकडा वाढत आहे. मृत्यूचे तांडव घडूनही रूग्णालय प्रशासन या घटनेमुळे आणि रुग्णालयाची दयनीय अवस्था झाल्याने रुग्णालयातील व परिसरातील अस्वच्छता पाहुन प्रचंड चिडलेल्या खा.हेमंत पाटील यांनी पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी विशेषत: रुग्णालयातील व परिसरातील अस्वच्छता पाहुन प्रचंड चिडलेल्या खा.पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या समवेत टॉयलेट स्वच्छ केले होते.
मात्र हाच मुद्दा अधोरेखित करुन या प्रकरणाचे वैद्यकीय अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटवले. आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ३५३ व अधिष्ठाता डॉ.वाकोडे हे अनुसूचित जमातीचे असल्याने त्यांनी अनुसूचित जाती जमाती आयोग अंतर्गत अँट्रॉसिटी अशी दोन खोटी गुन्हे दाखल करुन लोकशाहीस बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे याप्रकरणी जन आक्रोश समितीच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे तरी या जन आक्रोश मोर्चात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.