महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 व 8 वी साठी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
1 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड। महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक स्तर इयत्ता 5 वी व उच्च प्राथमिक स्तर इयत्ता 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या व जानेवारी/फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या मुल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी अंतिम मुदतवाढ प्रवेश अर्ज 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत, असे विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी शनिवार 7 ऑक्टोबर ते रविवार 15 ऑक्टोबर 2023 रोजीच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत तर सोमवार 9 ऑक्टोबर ते बुधवार 18 ऑक्टोबर 2023 या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेला संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे लागतील.

सोमवार 23 ऑक्टोंबर 2023 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करतील. या कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी 8 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरूवात करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!