
नवीन नांदेड। नांदेड तालुक्यातील बळीरामपुर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हिम्मंतपुर येथील नागरिकांना पुरवठा करण्यात येणांऱ्या राशन ( धान्य ) दुकानदारा कडुन लाभार्थांना धान्य वाटप लाभार्थांच्या संख्या पेक्षा कमी धान्य देणे,आंनदाचा शिद्याचे वाटप न करणे अशा तक्रारी केल्यानंतर वाजेगाव जिल्हा परिषद सदस्य तथा नांदेड तालुका क्रॉगेस आयचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील शिंदे यांनी भेट देत दुकान चालकांकडुन ” मापात पाप ” होत असल्याचे निर्दशनास आल्यानंतर या दुकानदारंका विरुध्द कार्यवाही करण्याचे आश्वासन दिपक मराळे नायब तहसिलदार यांनी दिले .
नांदेड तालुक्यातील बळीरामपुर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हिम्मतपुर येथील राशन दुकान क्रमांक १७१ मधील ८२ लाभार्थी असुन उर्वरीत ३६५ लाभार्धी हे बळीरामपुर येथील आहेत ,या ८२ लाभार्थी नागरिकांना धान्य वेळेवर मिळत नाही, धान्य कमी देण्यात येते ,आनंदाच्या शिद्यातील काही वस्तु मिळत नसल्याची तक्रार वाजेगाव जि .प .सदस्य मनोहर पाटील शिंदे यांच्याकडे करुन त्यांना राशन दुकांनाची भेट घेण्याची विनंती केली . त्यानंतर मनोहर पाटील यांनी २७ सप्टेंबर रोजी संबंधीत दुकान मालक माजंरमकर यांना बोलवले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिल्यानंतर मनोहर पाटील शिंदे यांनी नांदेडचे तहसिलदार संजय वारकड यांच्याकडे तक्रार केली.
त्यानंतर तब्बल दोन तासाच्या प्रतिक्षेनंतर नायब तहसिलदार यांची टिम हिम्मंतपुर येथे दाखल झाली यावेळी लाभार्थांनी स्वस्त धान्य माल वेळेवर येत नाही, लाभार्थी असुन सुध्दा त्यांना धान्य कमी देणे .सात ते आठ कुंटुंबात सदस्य असताना त्यांना नियमा प्रमाणे त्यांना धान्य दिले जात नाही, दोन, तिन महिण्याचा माल एकदाच दिला जातो. अंगठा घेण्यासाठी तासनतास बसुन ठेवल्या जाते,अगंठा घेवुन धान्य दिले जात नाही,यासह असंख्य तक्रारीचा पाठा वाचला. त्यानंतर त्यांनी धान्य वाटप करण्याचे आदेश दिले. तर लाभार्थांना देण्यात येणाऱ्या धान्याच्या वजनात मोठ्याप्रमाणात फरक आढळुन आला, त्यानंतर धान्यवाटप थांबवत त्यांनी दुसरे माप आणायला लावले ,पंरतु त्याही मापात मोठ्याप्रमाणात फरक जाणवत असल्याने त्यांनी धान्यवाटप थांबवत त्यांनी नागरिकाच्या लेखी तक्रारी घेवुन त्या धान्य दुकानचालका विरुध्द कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले .
लाभार्थी महिलानी ,नागरिक , युवकांनी हे दुकान तात्काळ बंद करुन हे दुकान महिला बचत गटाला देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी बळीरामपुरचे सरपंच प्रतिनिधी इंद्रजीत पाचाळ यांनी यासंबधीच्या तक्रारी आपल्याला या अगोदर दिल्या होत्या पण काही कार्यवाही झाली नसल्याचे निर्दशनास आणुन दिले .यावेळी बळीरामपुरचे उपसरपंच नागेश वाघमारे यांच्या सह मोठया प्रमाणात महिला नागरिक, युवक उपस्थित होते. धनेगावचे तलाठी राहुल सुर्यवंशी व पुरवठा विभागातील लिपीक सुरज माने हे ही संबधित ठिकाणी उपस्थित होते.
