श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| पोलीस विभागाशी संबंधित महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा व्हावा यासाठी डायल 112 या हेल्पलाइन नंबर वर वारंवार खोटी माहिती देत सतत पणे कॉल करून खोडसाळ पणे खोटी माहिती देऊन पोलिसांना विनाकारण त्रास देणाऱ्या माहूर तालुक्यातील मौजे मेट येथील एका तरुणाविरुद्ध पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेण्यात आल्याची घटना दिनांक 26.7. 2025 रोजी घडली आहे

दि 26/07/2025 रोजी वेळ 7:07 वा सुमारास मौजे मेट येथील 35 वर्षीय इसम व्यवसाय -चालक, रा. मेट ता. माहूर याने डायल 112 वर वर वारंवार, सतत पणे कॉल करून खोडसाळ पणे खोटी माहिती दिली कि, मौजे मेट येथे अवैद्य दारू विक्री चालू आहे, असे सांगितले वरून सदर ठिकाणी पोलीस गेले असता कॉलर हा कॉल उचलत नव्हता. नंतर त्याने मोबाईल बंद केला. त्याचे घरी जाऊन दारू विक्री कुठे चालू आहे.

असे पोलिसांनी विचारपूस केली असता कॉलरने खोडसाळ पणे खोटी माहिती 112 वर कॉल करून दिल्याचे सांगितले असता सदर इसमावर डायल 112 वर वारंवार, सतत पणे कॉल करून खोडसाळ पणे लोकसेवकास त्रास होईल या उद्देशाने खोटी माहिती दिल्याने त्याचे विरुद्ध कलम 212 बि एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरील कारवाई पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संदीप अन्येबोईनवाड पोहेका चालक जाधव पवन राऊत ज्ञानेश्वर खंदाडे यांचे सह होमगार्ड यांनी कार्यवाहीत मदत केली
