नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या खुदबेनगर भागात किरकोळ कारणावरून भरदिवसा धारदार चाकूने वयोवृद्ध ईसमाचा खुन करून दहशत पसरविल्या नंतर ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्याचा पथकाने या खुनातील आरोपींचा शोध घेऊन तात्काळ आरोपी अटक करून त्यांची खुदबेनगर भागात 23 जुलै रोजी भर रस्त्यावर व परिसरात धिंड काढून फिरवून या गुन्हेगार बाबत तक्रारी असल्यास पोलीसांनी कळविण्यांचा सुचना केल्या होत्या,परिसरात सकाळी दुतर्फा मोठ्या प्रमाणात नागरीकांनी गर्दी केली होती.

खुदबेनगर भागात हातागाडा लावण्याचा कारणावरून भर रस्त्यावर 19 जुलै रोजी सकाळी वयोवृद्ध ईसम शेख अजीम शेख समद यांच्या तिनं जणांनी धारदार चाकूने डोक्यावर व छातीवर पोटात मारून खुन करून आरोपी पळून गेले होते, यावेळी घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक व ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी भेट देऊन परिसरात आरोपीची शहानिशा करून संशयीत आरोपी ताब्यात घेतले.

यानंतर या खुनातील आरोपी महंमद अमीर महंमद गौस,रा.हबिबीया कॉलनी,मोईन खानपाशा खॉन रा.ईकबाल नगर यांना अटक करण्यात आली व त्याची या परिसरातील दहशत संपविण्यासाठी व नागरीकांनी आरोपीचा समक्ष पोलीस गाडीच्या स्पीकर वरून आवाहन करून सांगितले की,या आरोपींचा विरोधात काही सांगावयाचे असल्यास पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवायाचे असल्यास तसे सांगावे हे किंवा इतर परिसरातील दहशत पसरविणारे, सामान्य नागरीकांना त्रास देणारे किंवा गुन्हेगार वृत्तीचे ईसमावर कार्यवाही केली जाईल.

अश्या गुन्हेगाराविरूद्ध 112 किंवा पोलीस स्टेशन येथे मोबाईल वर संपर्क साधुन किंवा पोलीस स्टेशन येथे माहिती द्यावी,कायदा पैक्षा कोणाही मोठा नाही, कितीही मोठा आरोपी असतील तर त्यांना कायदा प्रमाणे सक्त कार्यवाही करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी आवाहन केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड, बाबुराव चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी यांच्यी उपस्थिती होती.
