श्रावण मास निमित्ताने जुना कौठा नांदेड येथील नरसिंह नरोबा संस्थान येथे धार्मिक कार्यक्रम आयोजन.
नवीन नांदेडl भाविक भक्तांचे जागृत देवस्थान असलेल्या जुना कौठा नांदेड येथील नरसिंह नरोबा देवस्थान येथे श्रावणमास निमित्ताने दररोज महा अभिषेक, महापूजा व महाप्रसाद दैनंदिन सकाळी आयोजित करण्यात आले आहे. पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने कै. गोविंदराव पाटील काळे यांच्या स्मरणार्थ माजी नगरसेवक राजु पाटील काळे यांच्या वतीने महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्रावणमास निमित्ताने लक्ष्मी नरसिंह नरोबा संस्थान कौठा नांदेड येथे श्रावण मास महापुण्य पर्वकाळ निमित्य अखंड श्रावण महिना नित्य अभिषेक महापूजा महाप्रसाद याचे आयोजन करण्यात आले आहे ,तर दररोज महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा व महाप्रसादाची वेळ सकाळी ८ ते११ ही असुन एकादशी निमित्य महिला मंडळ भजन कार्यक्रम दुपारी२ ते ७ पर्यंत आहे, तर महा अभिषेकाची वेळ सकाळी५;३० पासून नऊ पर्यंत अभिषेकासाठी संपर्क वेंकटेश मुळीगुरू मंदिर पुजारी मोबाईल नंबर९९६०९९३२५१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
श्रावणमास निमित्ताने पहिल्या श्रावण सोमवार कै. गोविंदराव पाटील काळे यांच्या स्मरणार्थ माजी नगरसेवक राजु पाटील काळे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,होतयांच्या सह परिवारातील सदस्य व भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते. श्रावणमास निमित्ताने एक महिना महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थान समितीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.