मनपा लोक अदालत साठी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ५० हजारावरील थकबाकी मालमत्ता धारकांना नोटीसा..
नवीन नांदेड l नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत २७ जुलै रोजी लोक अदालतीसाठी होणाऱ्या ११९९ मालमत्ता धारका कडील थकबाकी असणाऱ्या ५० हजारावरील थकबाकी मालमत्ता धारकांना वसुली लिपीक यांच्या मार्फत नोटीसा देण्यात येत असून थकीत मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी केले आहे.
नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ६ अंतर्गत एकुण मालमत्ता धारक जवळपास २८ हजार असुन मालमत्ता करापोटी थकीत मालमत्ता कर १८ कोटी ३५ लाख ९३ हजार ७५६ रूपये असुन चालू वर्षीच्या मालमत्ता कर ३कोटी ३ लाख ६५ हजार ६१७ आहे. असा एकुण २१ कोटी ३९ लाख ५९ हजार ३७३ रूपये आहे.
मनपा प्रशासन यांच्या वतीने मुख्यालय येथे २७ जुलै रोजी थकीत मालमत्ता करा संदर्भात संबंधित थकबाकीदार असलेल्या मालमत्ता कर धारकासाठी लोक अदालत ठेवण्यात आली असून यात मालमत्ता धारकांना थकीत बाकी रक्कम भरण्यासाठी आपले म्हणणे मांडुन कर भरता येणार आहे, विशेष म्हणजे ३१ जुलै साठी मालमत्ता थकीत बाकी वर ५० टक्के सुट दिली आहे.
मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर उपायुक्त अजितपाल संधु यांच्या आदेशानुसार सिडको क्षेत्रीय कार्यालय वाघाळा सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड ,कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांनी कार्यालय अंतर्गत ११९९ मालमत्ता धारकांना कर निरीक्षक संजय नागापूरकर, मारोती सारंग, प्रकाश दर्शने, व वसुली लिपीक यांनी वाटप केले आहे.