श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहूरचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.पर्यटनाचा वारसा लाभलेल्या माहूर शहरात निर्मनाधिन देखण्या अशा १० एकर विस्तार असलेल्या भोजंती तलावात पाणी साठल्याने हे तलाव डोळ्याचे पारणे फेडत आहे.
तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर शहरात पर्यटनाला वाव आहे.राज्य सरकार कडून दुर्लक्षित असेले तरी निसर्गाने या भागात भरभरून दिल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे पाय हळूहळू माहूर कडे पर्यटना साठी सुद्धा वढू लागली आहे.त्या मुळे शहरातील व माहूर गडावरील दुर्लक्षित असलेली पर्यटन स्थळे दृष्टीपथात येत आहे.यात अमृत योजनेतून १० एकर मध्ये निर्माण होत असलेल्या भोजंती तलावाची भर पडली असून हा देखणा तलाव गळमुक्त होऊन त्याची लांबी रुंदी वाढल्याने पाण्याने तलाव तुडुंब भरला आहे.
देव देवेश्वर संस्थांच्या मालकी व ताब्यातील तलाव नगर पंचायतच्या माध्यमातून सुसज्ज आणि सुंदर होत आहे.या तलावाचे सौंदर्य आणखी खुलवून एक पर्यटनाचे छानसे केंद्र बनविण्यासाठी नगर पंचायत चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी व सत्ताधारी नगर सेवक प्रशासन क्रियाशील असून केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत या तलावाचा कायापालट करण्यासाठी अमृत योजने अंतर्गत २४ कोटी रुपयांचा निधी त्यांनी खेचून अनाला आहे.या योजनेतून भोजंती तलावाला ” अमृत ” मिळत आहे.
या तलावाचे खोलीकरण, तलावाच्या भिंतीला पीचींग ही कामे पूर्ण करण्यात आली आहे.सध्या सुरू असलेल्या प्रास्ताविक कामात जॉगिंग ट्रॅक,विद्युत रोषणाई,पर्यटकांना बसण्यासाठी खुर्च्या,पेवर ब्लॉक बसविणे,बाग बगीचे, पिण्याच्या पाणी ची व्यवस्था,स्वच्छता गृह, आदी कामे करण्यात येणार असल्याने माहूर गडावर येणाऱ्या भाविकांसाठी हा तलाव पुढील काळात पर्यटनाचा केंद्र बनणार आहे.माहूरगड हे पौराणिक, ऐतिहासिक शहर असल्याने येथे अनेक तलाव आहेत.या पैकीच एक असलेला भोजंती तलावाचे अमृत योजनेतून सुशोभीकरण होत असल्याने या ऐतिहासिक तलावाचे सौंदर्य खुलणार असून माहूर शहराच्या वैभवात सुध्दा भर पडणार आहे.त्या मुळे देवदेवतांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविका तून पर्यटनाला ही चालना मिळणार आहे.
निर्मानाधिन भोजंती तलाव माहूर च्या पाणी टंचाई निवारणार्थ रामबाण:- दोसानी
माहूर शहरात चा मागील काळातील इतिहास बघितल्यास साधारण ऑक्टोंबर – नव्हेंबर मध्ये विहिर – बोअरवेल च्या पाणी पातळी खालवायची त्या मुळे पुढील पाच सहा महिने नागरिकांना गंभीर पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते अनेक भागात टँकर ने पाणी पुरवठा करण्यात येत होता.मात्र यंदा ही परिस्थिती बऱ्याच प्रमाणात निवडली आहे.भोजंती तलावाचा कायापालट करण्यासाठी २४ कोटी रुपयांचा निधी खेचून अनाला.या योजनेतून भोजंती तलावाला ” अमृत ” मिळत असल्याने पाणी पातळी वाढली आहे. माहूर शहराच्या नागरिकांना पुढील काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही असे दिसते. अशी प्रतिक्रिया फिरोज दोसानी, नगराध्यक्ष माहूर यांनी दिली.
माहूर शहरातील पाणी टंचाई कायमची मिटणार :- प्रदीप नाईक
अमृत योजनेतून माहूर शहरालगत चा देवदेवश्वर संस्थान च्या मालकीचे भोजंती तलाव गळमुक्त होऊन सुशोभीकणरन होत असल्याने माहूर शहरातील पाणी पातळी वाढणार आहे.पर्यटनाला ही वाव विळणार आहे.गत वर्षी ४० हजार ब्रास गाळ काढून तलाव १३ मीटर पर्यंत खोल करून गाळमुक्त करण्यात आले.देवदेवेश्वर संस्थानचे प.पु. महंत श्री मधुकरबाबा शास्त्री कवीश्वर यांनी तलाव सुशोभीकरणासाठी नगर पांचायातला सूशोभीकरणा साठी दिला नाही तर संपूर्ण शहरातील नागरिकांच्या पाण्याची सोय केली आहे.
त्यामुळे महंत महाराजांचे मानावे तेवढे आभार कमी आहे.या शिवाय नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी २४ कोटी चा निधी खेचून आणला व पेयजल समस्या सोडविण्यासाठी अतिशय महत्वाचे काम केल्याने फिरोज दोसानी यांना नगराध्यक्ष केल्याचे चीज झाली असे मला वाटते. अशी प्रतिक्रिया प्रदीप नाईक, माजी आमदार माहूर किनवट यांनी दिली.