नांदेड| आंतरराष्ट्रीय संस्था सृजन सन्मान द्वारा आयोजित 23 वा आंतरराष्ट्रीय हिन्दी संमेलन अल्माटी कझाकिस्तान येथे 9 ते 14 जून रोजी संपन्न झाला. या समेलनात नांदेड येथील महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त हिंदी साहित्यिक डॉ.सुनील गुलाबसिंग जाधव यांना आपल्या साहित्यिक योगदाना बद्दल विशेष राशी सह सलेकचंद जैन स्मृति सन्मान 2024 द्वारा सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान 23 व्या आंतरराष्ट्रीय संमेलनाचे अध्यक्ष सविता मोहन व सृजनसमानाचे समन्वयक जयप्रकाश मानस, साहित्यकार व समीक्षक प्रोफेसर मंगला रानी, प्रसिद्ध हिंदी व उर्दू गझलकार मुमताज, कुणाल जैन, कशमिरी साहित्यकार बिना बुधकी, उद्योगपती अलका गैरोला व ओडिया कवी गीतकार कृष्णकुमार प्रजापती तथा साहित्यकार माहेश्वरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यापूर्वी डॉ.सुनील जाधव यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या संमेलनात जनतंत्र का प्रतिपक्ष में साहित्य की भूमिका या विषयावर डॉ.सुनील जाधव यांनी व्याख्यान दिले तर त्यांच्या द्वारे संपादित शोध ऋतू पत्रिकेच्या 36 व्या अंकाचे लोकार्पण करण्यात आले तसेच सर्व भाषा रचना पाठ या सत्रा अंतर्गत मराठी व हिंदी कवितेचे पाठ त्यांनी केले. डॉ.सुनील जाधव यांच्या यशस्वीतेला उत्तर नांदेड चे पूर्व मंत्री डीपी सावंत तथा यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश चंद्र शिंदे तसेच त्यांच्या अनेक मित्रांनी शुभकामनांचा वर्षाव केला.