दुर्गावाडा विष्णुपूरी नांदेड येथे संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम बिजोत्सव ऊत्साहात संपन्न

नवीन नांदेड। संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज बिजोत्सव व धारूमाता मंदीर वर्धापन दिन दुर्गवाडा विष्णुपूरी ता. जि. नांदेड येथे वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा २१ ते २८ मार्च पर्यंत आयोजित करण्यात आला होता. २७ मार्च रोजी तुकाराम बिजोत्सव निमित्ताने हभप चंद्रकांत लाठकर यांच्या गुलालाचे किरतन संपन्न झाले यावेळी आमदार मोहनराव हंबरडे, माजी सरपंच राजु हंबरडे यांच्या सह भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित होते, आयोजित अखंड हरिनाम सप्ताह २८ मार्च रोजी सांगता होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दुर्गवाडा विष्णुपूरी येथील धारूमाता मंदीर वर्धापनदिन निमित्ताने व तुकाराम महाराज बिजोत्सव निमित्ताने वै. हभप मामासाहेब मारतळेकर, काळबा महाराज हरबळकर, माणिक महाराज सिडको यांच्या कृपाशीर्वादाने तसेच हभप राजेजी महाराज हनुमान मंदिर, पुजारी विष्णुपूरी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह,गाथा पारायण,व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी गुलालाचे कीर्तन हभप चंद्रकांत महाराज लाटकर यांचे झाल्या नंतर गुलाल ऊघळुन महाआरती झाली.
भागवताचार्य हभप बाबुराव महाराज पारडीकर,यांच्या सुमुधरवाणीतुन दररोज १२ ते ४ आयोजित करण्यात आली होती.
या सप्ताह मध्ये दैनंदिन काकडा आरती, गाथा पारायण,गाथा भजन,हरीपाठ, हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होते,तर रात्री हभप ज्ञानोबा महाराज मुडेकर, हभप कृष्णा महाराज सरनाईक रिसोड,आत्माराम महाराज रायवाडीकर, पंढरीनाथ मुरकुटे, अशोक महाराज ईदगे,ॲड. यादव महाराज वाईकर, दिपक गुरू महाराज पांगरेकर, व हभप वैजनाथ महाराज कागदे बापु उमरी यांच्या काल्याचे कीर्तनाने होईल.
२७ मार्च सकाळी श्रीमद भागवत कथा सांगता व संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज बिजोत्सव निमित्ताने हभप चंद्रकांत महाराज लाठकर याचे गुलालाचे कीर्तन व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, यावेळी आमदार मोहनराव हंबर्डे, धारोजी हंबर्डे,सरपंच प्रतिनिधी राजु हंबर्डे,उपसरपंच प्रतिनिधी विश्वनाथ हंबर्डे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अनिल हंबर्डे, माजी सैनिक बालाजी हंबर्डे,जयसिंग हंबर्डे,यांच्या सह पोलीस पाटील प्रविण हंबरडे ,जेष्ठ नागरिक व महिला,भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक व समस्त गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.
