
नांदेड। नांदेड पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड आदेशाने आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने रेकॉर्ड वरील पाहिजे, फरारी आरोपीचा शोध घेवुन अवैध धंद्यावर कार्यवाही करणे व संशईत हालचालीवर लक्ष ठेवणे या आदेशाचे पालन करीत सुशीलकुमार नायक,उपविभागीय पोलीस अधिकारी,इतवारा यांच्या मार्गदर्शना खाली सिडको परिसरातील कॅन्सर हॉस्पिटल मागील जयहिंद पार्कमधील आरोपी कडून पिस्टल व जिवंत कडतुस जप्त करण्यात आले या प्रकरणी ग्रामीण पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला .
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना अर्जुन मुंडे, पोकों चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, सायबर शाखेचे पोहेकों राजु सिटीकर यांनी काल दिनांक 26मार्च रोजी रात्री 10.25 वाजताच्या सुमारास सिडको, नांदेड परिसरातील कॅन्सर हॉस्पीटल च्या पाठीमागे जयहिंद पार्क येथे मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन छापा टाकुन आरोपी नामे सुशील मनोहर गावखोरे रा. कॅन्सर हॉस्पीटल च्या पाठीमागे जयहिंद पार्क, सिडको नांदेड यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातील विनापरवाना बेकायदेशीर बाळगलेले 01 गावठी पिस्टल व 02 जिवंत काडतुस मिळुन आल्याने ते जप्त केले.
यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गुन्हा नोंद क्रमांक 244/2024 कलम 3/25, 7/25 शख अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि बाबुराव चव्हाण करीत आहेत. या कार्यवाही बद्दल श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड व ईतर वरिष्ठांनी गुन्हे शोध पथक उपविभाग इतवारा यांचे कौतुक केले.
