मराठा आरक्षणाचा तिढा सुटे पर्यंत महावितरण भरती स्थगित करा… -मराठा सेवक श्याम पाटील वडजे
नांदेड। राज्य शासनाने 29 डिसेंबर 2023 रोजी महावितरण भरतीची जाहिरात काढली त्यात एकुण पदे ही 5347 पदासाठी भरती आहे असे नमूद करण्यात आलं खरं पण त्यात मराठा ही एकमेव जात अशी ठरत आहे की सदरील जातीसाठी एक ही जागा कुठल्याच आरक्षनात नाही, म्हणुन सरासर मराठा समाजावर एक प्रकारचा अन्याय होत असुन जो पर्यंत मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार नाही तोपर्यंत महावितरण ची ही भरती तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करावी अशी भुमिका सकल मराठा समाजांनी घेतली आहे.
डिसेंबर महिन्यात काढलेल्या जाहिरातीत मराठा समाजाला इ डब्लू एस या आरक्षणाचा लाभ घेता आला असता पण शासनाने अलीकडच्या काळात मराठा समाजाला जाहीर केलेलं 10% आरक्षण आणि ई डब्लू एस चा लाभ घेता न येणारे काढलेले परिपत्रक म्हणजे तोंड दाबुन बुक्क्याचा मार ही भुमिका राज्य सरकारची आहे असे रोखठोक मत नांदेड जिल्ह्याचे मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी व्यक्त केले.
शासनाने जाहीर केलेले एस ई बी सी चे 10%आरक्षण हे लागु जरी केले तरीपण त्यांचे प्रमाणपत्र हे अजुनही कुणाला मिळाले नसुन शासकीय कार्यालयात यावर कुणीही बोलायला तयार नाहीत आणि जरी विद्यार्थ्यांनाचा अर्ज भरून घेतलाच तर सदरील प्रमाणपत्र हातात पडायला किमान एक ते दिड महिन्यांचा कालावधी लागेल आणि महावितरण चा ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च आहे. मग अशा वेळी एक तर एस ई बी सी आरक्षनातून एकही जागा नाही आणि दुसऱ्या बाजुने इडब्लूस आरक्षणाचा लाभ घेता येत नाही.
अशा दुहेरी आरक्षणाच्या तिढ्यात मराठा समाजातील विद्यार्थी अडकले असुन सदरील भरतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे त्यामुळे ही भरती तात्पुरती स्थगित करून मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढत सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करून मगच भरती घ्यावी अन्यथा या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सरकारला घेरल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही असा प्रखर ईशारा सुद्धा मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी दिला आहे.