शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने महाशिवरात्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची थाटात सांगता
हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील आठ दिवसापासुन महाशिवरात्रीच्या निमित्ताने हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिरात सुरु असलेल्या अखंड हरिणाम, विना पहारा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता दि. १४ मार्च गुरुवारी ग्रामदिंडी व हभप.दत्तात्रय महाराज फुलारी लातूरकर यांच्या मधुर वाणीतील काल्याच्या किर्तनाने करण्यात आली. याप्रसंगी ग्रामीण व शहरी भागातुन हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांचा जनसागर श्री परमेश्वर मंदिर परिसरात लोटला होता.
ग्रंथराज पारायण शेवटच्या दिवशी म्हणजे अखंड हरिणाम सप्ताह समाप्ती नीमीत्त दि.१३ रोजी रात्रीला दीपोत्सव साजार करून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा महिला परायणनार्थी कडून समारोप करण्यात आला. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या रोषणाईने झगमगून निघाला होता. दि. १४ मार्च रविवारी सकाळी ९ वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची पालखी दिंडी व्यासपीठाचार्य हभप परमेश्वर महाराज कदम डोल्हारीकर यांच्या नेतृत्वाखील शहरातील मुख्य रस्त्यावरुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत चिमुकल्या मुलीं व शेकडो महिलांनी डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन सहभागी झाले होते. तसेच टाळ मृदंगच्या गजरात श्री परमेश्वर भजनी मंडळाच्या वारकरी महीला व पुरुषांनी टाळ धरुन शहर वासीयांना आकर्षीत केले. शहरातील मुख्य रस्त्यावरून निघालेली शोभा यात्रा परत श्री परमेश्वर मंदिरात येऊन सत्कार समारंभ व महाप्रसादाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा समारोप करण्यात आला.
दुपारी ०१.३० वाजता सुरु झालेल्या काल्याच्या कीर्तनात जवळपास ३ तास हभप.दत्तात्रय महाराज फुलारी लातूरकर यांनी उपस्थित भक्तांना श्रीकृष्ण लीलाचे सखोल असे मार्गदर्शन करून भक्तीचा मार्ग दाखविला. सायंकाळी ५ वाजता काल्याच्या किर्तनानंतर राधा -कृष्णाची झाकी साकारलेल्या बालकांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. काल्याच्या प्रसाद वितरणानंतर दहीहंडी फोडलेल्या राधाकृष्णीची मीरवणुक शहरातील मुख्य रस्त्यावरुन टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आली होती. यावेळी सहभागी झालेल्यांची राधा कृष्ण गोपालकृष्ण नामाचा जयजयकार केला. दरम्यान तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष सौ.पल्लवी टेमकर यांनी मंदिरास भेट देऊन दर्शनघेतले आणि कार्यक्रमाच्या नियोजनाचा व सुरक्षेचा आढावा घेतला.
यावेळी परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, राजेश्वर चिंतावार, लक्ष्मण शक्करगे, विठलराव वानखेडे, प्रकाश शींदे, राजाराम बलपेलवाड, वामनराव बनसोडे, लताबाई पाध्ये, लताबाई मुलंगे, मथुराबाई भोयर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, ऍड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, सुभाष शिंदे, विठ्ठल ठाकरे, रामराव सूर्यवंशी, मनोज यंगलवार, संतोष रेखावार, रामभाऊ सूर्यवंशी, राजु गाजेवार, मारोती हेंद्रे, राजू राहुलवाड, संतोष गाजेवार, ज्ञानेश्वर शिंदे, गोविंद शिंदे, किरण माने, विपुल दांडेवाड, सितू सेवनकर, दिलीप आरेपल्लू, मारोती वाघमारे, प्रकाश साभळकर, दत्ता काळे, अनिल भोरे,रामू नरवाडे, गजानन चायल, उदय देशपांडे, पापा पार्डीकर, उत्कर्ष मादसवार, बाबूराव भोयर गुरुजी,सौ. ज्योती पार्डीकर, सौ. सुनंदा दासेवार, सौ.रुघे बाई, सौ. चवरे बाई, सौ. देशपांडे बाई, रेखा डांगे, सौ जोगदंड, सौ.तिमापुरे बाई, सौ. बंडेवार, कोमावार, पेन्शनवार, मुद्रेवार, यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे युवक स्वयंसेवक महिला – पुरुष, विद्यार्थी व गावकरी नागरीक हजारोच्या संख्येने उपस्थीत होते.