क्राईमनांदेड

संशयित महिला मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल; हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील घटना

वडगाव/पोटा, पांडुरंग मिराशे। हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील रहिवासी सौ.अनिता दत्ता जळपते वय वर्ष 46 या महिलेचा दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी रात्री आठ वाजता शेतामध्ये संशयित मृतदेह आढळून आल्याने घडलेल्या घटनेबद्दल मृत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात एका आरोपी विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल झाला.

पोटा बुद्रुक येथील रहिवासी अनिता दत्ता जळपते वय 46 वर्ष ही दिवसभर आपल्या शेतात आपल्या मोठ्या मुलासोबत काम करीत होती परंतु रात्र झाली असतानाही ती घरी न परतल्याने तिचा पती दत्ता दळपते यांनी शेतामध्ये धाव घेऊन पाहिले असता आपली पत्नी मृता अवस्थेत शेतात पडून असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने तो तातडीने गावात येऊन घटनेचे वृत्त सर्वांना कळवले तेव्हा गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बघण्यासाठी तोबा गर्दी केली होती घटनेचे वृत्त संबंधित मृत महिलेच्या भावांनी हिमायतनगर पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक जऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदय व बीट जमादार पाटील यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवइच्छेदनासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

मृत महिलेचा भाऊ मारुती संभाजी चिंतलवाड राहणार वारंग टाकळी तालुका हिमायतनगर यांनी दाखल केलेले फिर्यादीमध्ये आरोपी सचिन उर्फ गजानन दत्ता यांनी माझ्या बहिणीचा दगडाने ठेचून खून केला असा आरोप केला आहे पूर्वीही त्यांनी माझ्या बहिणीला शॉर्ट सर्किट लावल्यांचे माझ्या बहिणीने मला सांगितले होते असे लेखी निवेदनात नमूद केल्याने यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन उर्फ गजानन दत्ता जळपते यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मुद्दे व बिट जमादार पाटील हे पुढील तपास करीतआहेत.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!