आर्टिकलधर्म-अध्यात्मनांदेड

हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव

हिमायतनगर (वाढोणा} नगरीतील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर सातशे 12 वर्षाहुन अधिक जुने असुन, सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. या मंदिराचा इतिहास अतिप्राचीण असुन, हेमाडपंथी उत्तराभीमुख मंदिरातील गाभा-यात शिवशंकर – विष्णुच्या अवातारातील हरीहर रुपातील श्री ची उभी मुर्ती आहे. अत्यंत देखणी व सर्वांग सुंदर अशी श्री परमेश्वराची मुर्ती काळ्या पाशानात घडवीलेली असुन, परम अधिक इश्वर म्हणजेच परमेश्वर हे देवाधीदेव आहेत. या मुर्तीचे वर्णन किंवा या मुर्तीशी अन्य देवतांच्या मुर्तीशी साम्य असणारे वर्णण आढळुन येत नाही. त्यामुळे हि मुर्ती भारतात एकमेव मुर्ती आहे, असे म्हणता येईल. भक्तांच्या नवसाला पावणारा देव म्हणुन विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश व ईतर भागात ख्यातीप्राप्त झाला असुन, या मंदिराशी तसेच जनतेशी भावनीक नाळ जुळालेली आहे. म्हणुन महाशीवरात्रीच्या दिवशी श्रीच्या दशर्नासाठी लाखों भवीकांची दर्शनासाठी वाढोणा नगरीत मंदियाळी होते.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर ( वाढोणा ) नगरीतील श्री परमेश्वर मुर्ती बाबत एक आख्याईका सांगीतली जाते की, येथील शेतकरी श्री गणपत माळी (दळवे पाटील) हे शेतात नांगर हाकत असतांना नांगराला एक भली मोठी शिळा लागली. येवढया मोठा काळ्या पाशानाचा दगड कशाचा आहे, म्हणुन जमीन खोदुन शिळा बाहेर काढली असता, श्री परमेश्वराची अत्यंत सुरेख आणि रेखीव अशी मुर्ती आढळुन आली. हि वार्ता वाढोणा गाव व परिसरात वार्‍यासारखी पसरली. गाव व ग्रामीण परीसरातील नागरीक परमेश्वराची देखनी मुर्ती पाहण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी करु लागले. त्यावेळी काही प्रतीष्ठीत व्यक्तींनी ज्या ठिकाणी मुर्ती नांगराला लागली त्याच ठिकाणी विधीवत प्रतीष्ठापणा करुन पुजा – अर्चना केली.

त्यावेळी पुरण पोळीच्या पंगती झाल्या, तो काळ अंदाजे 712 वर्षाहुन अधिकचा असावा, त्या काळी येथे मोगल राजवट होती. मुर्तीची प्रसीध्दी दुर- दुरवर झाल्याने गावातील प्रतीष्ठीत नागरीक व भावीक भक्तांच्या मदतीने विडुळ उमरखेड येथील तात्या पौळकर यांनी सन 1309 साली परमेश्वराचे मंदिर मोठ- मोठ्या दगडी शिळाने उभारले. मंदिराच्या अंदाजे 10 फुट खोल  भुयारात शंकररुपी अवतारातील चतुर्भुज श्री परमेश्वराची मुर्ती उभी केली. मुर्तीची उंची 5 फुट, रुंदी 3 फुट 1 इंच आहे. वरिल उजव्या हातात जायफळ- त्रीशुळ, डाव्या हातात फना काढलेला शेषनाग व पार्थ धारण केलेला आहे. खालील उजव्या हातात रुद्राक्षाची जपमाळ, डाव्या हातात शंख आहे. मस्तकावर कोरीव मुकुट असुन, मध्यभागी दोन सुर्य व शीरोभागी शिवलींगाची शिवपींड आहे. श्रीच्या पायाजवळील एक बाजुस गरुड तर दुस-या बाजुस नंदि उभा आहे. मुर्तीच्या आजुबाजुला अनेक प्रभावशाली देवी- देवतांच्या मुर्तीचे अवतार आहेत. मुर्तीला पहाणा-या भक्तांना दहा अवतार दिसत असुन, कच्छ, मत्स्य, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौध्द व घोडयावर स्वार असलेला कळंकी अवताराचा समावेश आहे. अशी ही मुर्ती हरीहर (शंकर आणि विष्णु रुपात) दिसत असल्यामुळे देवाच्या मुर्तीला श्री परमेश्वर असे नाव दिल्या गेले असल्याचे सांगितले जाते आहे. मंदिराच्या गाभार्‍याचे बांधकाम पुर्वीच्या काळात अत्यंत कलाकुसरीने करण्यात आले असुन, त्यामद्ये मोठ-मोठ्या रेखीव शिळांचा उपयोग केल्याचे प्रत्यक्ष दर्शी दिसत आहे.गाभार्‍याच्या पुर्व आणि पश्‍चीम दिशेला झरोके असुन सुर्योदयाच्या वेळी सुर्याची पहीली किरणे श्रीच्या मुर्तीवर पडतात.

आणि सुर्य मावळतीच्या वेळी पश्‍चीम बाजुच्या झरोक्यातुन सुर्य किरणे मु्र्तीच्या पाठमोर्‍या भागावर पडतात. हे आजच्या विज्ञान युगातील अभियंत्याना सुध्दा आश्‍चर्य चकीत करणारे बांधकाम आहे. याच मंदिरात शिवापतीचे मंदिर असुन,महादेवाची भली मोठी पिंड ,निद्रावस्थेतील शेषनारायण (विष्णुची)मुर्ती, बाजुस लक्ष्मीनारायण, गणेशमुर्ती, चिंतामणी नंदि आहे. तसेच मंदिरात अन्य देवी -देवतांच्या पुरातन काळातील रेखीव मुर्त्या आहेत. मंदिराच्या आवारात काळेजी महाराजांची समाधी, नंदादीप- दिपमाळी, चिरेबंधी बारव (विहीर)असुन पुर्वी त्यामद्ये उतरण्यासाठी पायर्‍याही होत्या. मंदिराचा संपुर्ण भाग अंदाजे 2 एकर येवढा असुन आवाराच्या चारी बाजुने सुरक्षा भिती उभारलेल्या असुन, पुर्व आणि उत्तरेस भव्य प्रवेश व्दार आहे.जुन्या काळात गावातील प्रतीष्ठीत लोकांची समीती नेमुन मंदिराचा कार्यभार पाहील्या जात होता.त्या काळी गावातील माली पाटील, पोलीस पाटील आणि काही प्रतीष्ठीत लोक समीतीत सदस्य म्हणुन सहभागी होते.

ई.स.1962 पासुन ट्रस्ट कमेटी निवडण्यात आली व सहाय्यक धर्मदाय आयुक्त नांदेड येथील कार्यालयात हिमायतनगर येथील जागृत देवस्थान परमेश्वर मंदिराची नोंद करण्यात आलीप्राचीण काळापासुन महाशिवरात्रीच्या दिवशी श्री परमेश्वराच्या दर्शनासाठी विदर्भ,मराठवाडा आंद्रप्रदेश, कर्नाटकासह दुर-दुर वरुन भावीक लाखोच्या संख्येने हाजेरी लावतात. सकाळी 3 वाजल्या पासुन श्रीच्या दर्शनासाठी भावीकांची रिघ लागुन असते. महाशिवरात्रीला श्रीचा विधीवत अभिषेक व आलंकार सोहळा केला जाउन सोन्या चांदीचे भव्य दागीने मुर्तीस चढवील्या जातात. पाच दिवस दहीहंडी काल्या पर्यंन्त ही दागीने श्रीच्या मुर्तीवर असतात. तेंव्हा हि अलंकारमय परमेश्वराची मुर्ती अत्यंत देखणी व सुंदर दिसत असल्याने भक्तांचे मन प्रसन्न होउन डोळ्याचे पारणे फिटते.

ह्या मंदिराला महाराष्ट्र शासनाने मागील 10 वर्षांपूर्वी आ.माधवराव पाटील जवळगांवकरांच्या प्रयत्नाने तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. सध्य स्थितीत मंदिराचा कारभार श्री परमेश्वर ट्रस्ट कमेटीचे विश्वस्त अध्यक्ष तहसिलदार हिमायतनगर, उपाध्यक्ष महावीसेठ श्रीश्रीमाळ, सचिव अनंतराव देवकते, संचालक राजेश्वर चिंतावार, लक्ष्मणराव शक्करगे, देवीदास मुधोळकर, शाम पवनेकर, प्रकाश कोमावार, विठ्ठलराव वानखेडे, प्रकाश शिंदे, वामनराव बनसोडे, राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, व लिपीक बाबुरावजी भोयर ( तसेच कै.ग्यानबाराव माने, कै.विक्रम शिंदे, कै.किशनरामलू मादसवार, कै. भास्करराव दुसे, कै संभाजी जाधव सर, कै.मूलचंद पिंचा यांचेही मंदिराच्या विकास कामात भरपूर असे योगदान मिळले आहे.) एकूणच या सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातुन मंदिराच्या सर्वांगीन विकासाची घौडदौड भावीक भक्तांच्या माध्यमातुन सुरु आहे.

मागील दोन वर्षात श्री परमेश्वर मंदिराच्या वैभवात भर पाडण्यासाठी रिंगबिरंगी कारंजे, एलईडी टीव्ही, मंदिर परिसरात सुशोभीकरण व विद्दुत रोषणाई यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. महाशिवरात्री पर्वात सुरू असलेल्या यात्रेत विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व शेतकऱ्यांसाठी विविध स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री रोजी मध्यरात्री तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या सहपरिवार तर्फे श्री चा अभिषेक व अलंकार सोहळा संपन्न होणार आहे. सध्याचे हिमायतनगर प्रा़चीण कळातील वाढवणे हे पैनगंगा नदिपासुन दिड मैल तर मातापुर(माहुर) या शक्तीपीठापासुन 30 मैलावर वसलेले आहे. भारतात 12 जेातीर्लींगे असुन, त्यापैकी एकट्या महराष्ट्रात पाच त्यापैकी तिन जोतीर्लींगे मराठवाडयाच्या मातीत असुन, महाराष्ट्रातच नव्हे संबध देशात शंकर महादेवाची अनेक मंदिरे – देवस्थाने आहेत. परंतु शंकराच्या अलंकृत विभुशीत उभी चतुर्भुज मुर्ती वाढोणे नगरीशीवाय भारतात कुठेही पहावयास मिळत नाही असे, आजवर सदर मंदिरास भेट दिलेल्या विवीध प्रसिध्द साधु- महंतांचे म्हणने आहे. प्रचीण कालीन वरणावती, मध्यंतराचे वाढोणे आणि सध्याचे निजाम राजवटीतुन जन्मास आलेले हिमायतनगर होय.

माहुरच्या जगदंबा मातेचे एक परम भक्त कवी विष्णुदास यांनी परमेश्वराची मुर्ती पाहुन तीथल्या तीथे रचलेली आरती भावीक भक्तांत लोकप्रीय ठरली.

// श्री परमेश्वराची आरती //

जयशिवशंकर,सर्वेशा / परमेश्वर,हरिहरवेषा // धृ //
कर्पुरगौरा,शुभवंदना / श्रीघननीळा, मधुसुदना सदाशिव, शंभोत्रिनयना/
केेशवाच्युता, अहीशयना अखंड, मी शरण मदनदहना /
दाखवी चरण गरुड वाहना दयाळा हिमनगजामाता /
कृपा कर श्रीलक्ष्मीकांता स्तविंतो दिनवाणि, पाव निर्वाणी,गजेंद्रवाणि सोडवी तोडुनि भवपाशा /
धाव अवलिंबे जगदिशा // जय.//1//
सुशोभितजटामुकुटगंगा / धृतपदलांच्छनभुजंगा वामकरतलमंडितलिंगा /
त्रिशुळ,जपमाळ,भस्म अंगा निरंजन.निर्गुण,नि:संगा /
सगुण रुप सुंदर आभंगा,क्षितितळवंटी जगदोध्दारा /
करुणामृतसंगमधारा जाहली प्रकट,चिंतीतां लगट,शीघ्र सरसकट करी नटखट चट गट क्लेशा /
पालटवी प्राक्तनपटरेषा // जय //2 // लाविती कर्पुरदिप सांभा /
आरती करिती पद्मनाभा, दिसतसे इंद्रभुवन शोभा,कीर्तने होति,गाति रंभा निरसुन काम क्रोधलोभा /
लाभति नर दुर्लभ लाभा,व्दिजांच्या सहस्त्रावधि पंक्ति /
प्रसादें नित्य तृप्त होती,चंद्रदिप भडके,वाद्य ध्वनी धडके,पुढे ध्वज फडके,पतित जन होति निर्देाषा /
ऐकुनि भजनाच्या घोषा // जय // 3 //
दीन ब्रिद वत्स वाढविणें /यास्तव रचिलें वाढवणें,प्रभुच्या चरणाश्रयिं रहाणें /
वांच्छिति सनकादिक शाहणे,कशाला भागिरथिंत न्हाणें /
तरि नको पंढरपुर पाहणे,पहातां समुळ द:ख विसरे /
भुलोकीं वैकुंठचि दुसरें,गरुड बैलास,वाटे कैलास,चढे उल्हास विंष्णुदास पावे हर्षा /
करिता नमन आदिपुरुषा // जय // 4 // ….  कवि विष्णुदास

……अनिल मादसवार, तालुका प्रतिनिधी दैनिक गावकरी, हिमायतनगर, जी.नांदेड. संपर्क – 9764010107  

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!