हिमायतनगर। आज सकाळी साधारण दहाच्या सुमारास हादगाव येथील कार्यकर्त्यांचा फोन आला होता, हादगाव वरून दोन ट्रक गोवंशाचे येत असल्याची माहिती त्यांनी दिली. सदरील माहिती हिमायतनगर पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर बेफाम स्पीडने येणारे हे दोन ट्रक सोनारी फाटा येथे गोरक्षक कार्यकर्त्यांनी उसाचे ट्रक आडवे लावून हे दोन्ही गोवंशाचे ट्रक थांबवण्यात यश मिळवीले आहे.
सदरील दोन्ही ट्रक तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी गोवंश घेऊन जात होते. ट्रक क्रमांक सी जी 04 जेडी 5357, आणि एम एच 40 सी एम 2712 दोन्ही 12 टायरचे ट्रक आहेत. यामध्ये गोवंश अतिशय क्रुरपणे चारही पाय बांधलेल्या अवस्थेत आढळुन आले आहेत. दोन्ही वाहनात एकुण 55 गोवंश असून, त्यापैकी 4 मयत झालेले आहेत.
नांदेड जिल्ह्यात दि 08/02/2024 रोजीच गोहत्या आणि गोवंश तस्करीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धरने आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर पोलिस प्रशासनाने हदगाव टी पाॅईंट, ऊमरी येथे मामा चौकात आणि सारखणी अशा 3 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती, तरीही हदगाव नाकाबंदी तोडुन गोवंशाची कत्तलीसाठी वाहतुक चालुच होती.
याबाबत विश्व हिंदु परिषदेच्या वतीने वरिष्ठांना दि 15 फेब्रुवारी 24 रोजी च्या मिटींग मध्ये लक्षात आणुन दिले होते. तरीही गोवंशाची कत्तलीसाठी तस्करी सुरूच होती याची आज पुन्हा संबंध महाराष्ट्राला प्रचीती आली आहे. राज्यात गोहत्याबंदी कायदा ” प्राणी संरक्षण अधिनियम 1995 (सुधारीत), प्राणी अत्याचार अधिनियम आणि ईतर तत्सम कायदे असतांना देखील या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानेच हे तस्करी राजरोसपणे सुरू आहे.
यानंतर गोहत्या आणि गोवंशाची कत्तलीसाठी वाहतुक सुरूच राहीली तर प्रखर आंदोलन करण्यात येईल – किरण बिच्चेवार, नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत यांनी ईशारा दिला आहे. आजच्या कारवाईत हदगाव, तामसा आणि हिमायतनगर येथील गोरक्षक कार्यकर्ते सहभागी होते, हिमायतनगर पोलीसांनी वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई केली त्याबद्दल परीसरात सर्वांचे कौतुक केले जात आहे.
विशेष बाब म्हणजे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील पोलीसांनी प्राण्यांच्या केस मध्ये काय काय कारवाई केली पाहिजेत यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना (SOP) दिलेल्या असतांना त्याची देखील अंमलबजावणी होत नाही म्हणुन गोहत्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.